हुश्श, भारत तिसरी वन डे जिंकला, बांगलादेशचा दारुण पराभव

INDvsBAN 3rd ODI in Chattogram, Kishan 210, Kohli 72nd ton hand India a mammoth win : भारताने दिलेल्या 50 ओव्हरमध्ये 410 धावा करण्याच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात बांगलादेशची टीम अपयशी ठरली.

INDvsBAN 3rd ODI in Chattogram
हुश्श, भारत तिसरी वन डे जिंकला, बांगलादेशचा दारुण पराभव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ईशानचे द्विशतक, विराटचे शतक
  • वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी
  • भारताचा धावांचा डोंगर

INDvsBAN 3rd ODI in Chattogram, Ishan Kishan 210 and Virat Kohli 72nd Ton power India to 409, INDvsBAN 3rd ODI in Chattogram, Kishan 210, Kohli 72nd ton hand India a mammoth win :

हुश्श, भारत तिसरी वन डे जिंकला, बांगलादेशचा दारुण पराभव ( INDvsBAN 3rd ODI in Chattogram, Kishan 210, Kohli 72nd ton hand India a mammoth win )

भारताने दिलेल्या 50 ओव्हरमध्ये 410 धावा करण्याच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात बांगलादेशची टीम अपयशी ठरली. बांगलादेशला 34 ओव्हरमध्ये 182 धावांची मजल मारता आली. भारताने बांगलादेशला ऑलआऊट केले. बांगलादेश विरुद्धची तिसरी वन डे भारताने 227 धावांनी जिंकली. पण पहिल्या दोन वन डे मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. यामुळे 3 वन डे मॅचच्या सीरिजचा निकाल 2-1 असा लागला. सीरिज बांगलादेशने जिंकली पण अखेरची मॅच जिंकून भारताने व्हाईटवॉश टाळले.  । स्कोअरकार्ड

शेवटच्या मॅचमध्ये बांगलादेशकडून अनामुल हकने 8, कॅप्टन असलेल्या लिटन दासने 29, शाकिब अल हसनने 43, मुशफिकुर रहीमने 7, यासिर अलीने 25, महमूदुल्लाहने 20, अफीफ हुसेनने 8, मेहदी हसनने 3, तस्कीन अहमदने नाबाद 17, एबादोत हुसेनने शून्य, मुस्ताफिजुर रहमानने 13 धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकुरने 3 तर अक्षर पटेल आणि उमरान मलिकने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.  । स्कोअरकार्ड

तिसऱ्या वन डे मध्ये द्विशतक करणारा भारताचा ईशान किशन मॅन ऑफ द मॅच झाला तर बांगलादेशचा मेहदी हसन मॅन ऑफ द सीरिज झाला.  । स्कोअरकार्ड

ईशानचे द्विशतक, विराटचे शतक, वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी, भारताचा धावांचा डोंगर

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर ईशान किशन याने 131 बॉल खेळून 210 धावा तर विराट कोहलीने 91 बॉल खेळून 113 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 27 बॉल खेळून 37 धावा तर अक्षर पटेलने 17 बॉल खेळून 20 धावा केल्या. या चार फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. । स्कोअरकार्ड

शिखर धवनने 3 धावा, श्रेयस अय्यरने 3 धावा, कॅप्टन आणि विकेटकीपर असलेल्या केएल राहुलने 8 धावा, शार्दुल ठाकुरने 3 धावा, कुलदीप यादवने नाबाद 3 धावा आणि मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावा असे योगदान दिले. यामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 8 बाद 409 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन, तस्कीन अहमद आणि एबादोत हुसेन या तिघांनी प्रत्येकी 2 तर मुस्ताफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. बांगलादेशसमोर भारताने 50 ओव्हरमध्ये 410 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे. । स्कोअरकार्ड

बांगलादेशने भारताविरुद्धच्या 3 वन डे मॅचच्या सीरिजच्या पहिल्या दोन मॅच जिंकल्या आहेत. यामुळे तिसरी मॅच जिंकून बांगलादेश भारताला व्हाईटवॉश देणार की भारत तिसरी मॅच जिंकून व्हाईटवॉश टाळणार हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल.

भारत विरुद्ध बांगलादेश वन डे सीरिजमध्ये

  1. 4 डिसेंबर 2022, पहिली वन डे, ढाका - बांगलादेशचा 1 विकेट राखून विजय
  2. 7 डिसेंबर 2022, दुसरी वन डे, ढाका  - बांगलादेशचा 5 धावांनी विजय
  3. 10 डिसेंबर 2022, तिसरी वन डे, चट्टोग्राम - तिसरी वन डे भारताने 227 धावांनी जिंकली

सुपरफास्ट ईशान किशन

  1. वनडेत सर्वात जलद द्विशतक करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ईशान किशन
  2. अवघ्या 126 चेंडूत द्विशतक पूर्ण करणारा फलंदाज ईशान किशन

वनडेत जलद द्विशतक करणारे खेळाडू

  1. 126 चेंडूत - ईशान किशन, विरुद्ध बांगलादेश (2022)
  2. 138 चेंडूत - ख्रिस गेल, विरुद्ध झिम्बाब्वे (2015)
  3. 140 चेंडूत - वीरेंद्र सेहवाग, विरुद्ध वेस्ट इंडिज (2011)

ODI मध्ये भारतासाठी द्विशतक करणारे

  1. सचिन तेंडुलकर
  2. विरेंद्र सेहवाग
  3. रोहित शर्मा (3 द्विशतके)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी