INW vs PAKW T20 WC: सात विकेट्स राखत भारताचा दणदणीत विजय; पाकिस्तानला पराभूत करणारी जेमिमाह बनली सामनावीर

INDW vs PAKW T20 World Cup : भारताची स्मृती मानधना मॅचमध्ये नसताना देखील पाकिस्तानला ( Pakistan) पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आलं. त्याच कारण आहे, जोमिमाह रॉड्रिग्सने केलेलं अर्धशतक. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या.

Jemimah who defeated Pakistan became man of the match
अर्धशतक ठोकणारी जेमिमाह रॉड्रिग्स बनली सामनावीर   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 149 धावा केल्या होत्या.
  • पाकिस्तानकडून बिस्माह हिने 68 धावांची खेळी केली होती.
  • अर्धशतक करणारी जेमिमाह सामनावीर ठरली.

INDW vs PAKW T20 World Cup Match : भारतीय संघाने (Indian team)रविवारी महिला टी20  विश्वचषकातील (Women's T20 World Cup) आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताची स्मृती मानधना मॅचमध्ये नसताना देखील पाकिस्तानला ( Pakistan) पराभूत करण्यात भारतीय संघाला यश आलं. त्याच कारण आहे, जोमिमाह रॉड्रिग्सने केलेलं अर्धशतक. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या.  (INDW vs PAKW T20 WC: India win by seven wickets; Jemimah who defeated Pakistan became man of the match)

अधिक वाचा  : तुमच्या प्रेमाला या सुंदर वॉलपेपरसह पाठवा खास massage

चौकार मारत आपलं अर्धशतक पुर्ण करणाऱ्या जेमिमाहला  सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. पाकिस्तानने  टॉस जिंकत भारतासमोर 150 धावांचा डोंगर उभा केला होता.  पाकिस्तानने  20 षटकांत 4 गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. दरम्यान प्रत्युत्तरात भारताने 19व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिया रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हा ऐतिहासिक विजय मिळवला. 

पाकिस्तानच्या महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियापुढे धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 149 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बिस्माह हिने 68 धावांची खेळी केली होती. बिस्माहला आयेशा हिने साथ देत 43 धावा केल्या होत्या. या दोघींच्या खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं 150 धावांचं लक्ष भारतासमोर उभं केलं होतं.

अधिक वाचा  : WhatsApp,imagesने द्या Kiss Day च्या शुभेच्छा

जेमियानं विजयाची पताका फडकावली 

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने संयमीपणे सुरुवात केली होती. भारताकडून शफाली वर्माने सलामीपासून आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. शफालीने 25 बॉलमध्ये 33 धावा केल्या. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सूत्रं जेमिया आणि रिचाने हातात घेतली. जेमियानं 38 बॉलमध्ये बिनबाद 56 धावांची खेळी केली. तर, रिचानं तिला साथ देत 20 बॉलमध्ये 31 धावांची खेळी केली. दोघींच्या खेळीच्या जोरावर भारतानं विजयाची पताका फडकावली.  

भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 28 धावांची गरज होती. 18व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तिने 19व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 19व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तिने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले. जेमिमाहच्या टी20 कारकिर्दीतील हे 10वे अर्धशतक होते. जेमिमाह 55 चेंडूत 68 धावा करत नाबाद राहिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी