इन्शुरन्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडियाची विजयी सुरूवात, शेखर कदमची शानदार खेळी 

मुंबईत चर्चगेटजवळील क्रॉस मैदानात सुरू असलेल्या इन्शुरन्स शिल्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने विजय सुरूवात केली आहे. तीन साखळी सामन्यांच्या या स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब

insurance shield t 20 cricket tournament  times of india win
 इन्शुरन्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडियाची विजयी सुरूवात, शेखर कदमची शानदार खेळी   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : मुंबईत चर्चगेटजवळील क्रॉस मैदानात सुरू असलेल्या इन्शुरन्स शिल्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने विजय सुरूवात केली आहे. तीन साखळी सामन्यांच्या या स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने कॅनरा बँकेचा ५ गडी राखून विजय मिळवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या विजयात विकेटकीपर फलंदाज शेखर कदम आणि गोलंदाज पंकज सावंत यांचा वाटा राहिला.  शेखरने नाबाद ४९ धावा केल्या तर पंकजने ३ विकेट पटकावल्या. 
 
 टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार परितोष मोहिते याने नाणेफेक जिंकून  कॅनरा बँकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. निर्धारित २० षटकात कॅनरा बँकेने ८ बाद १२३ धावा केल्या.  यात कॅनरा बँकेच्या किरण जाधव याने सर्वाधिक २९ धावा केल्या. टाइम्स ऑफ इंडियाकडून भेदक गोलंदाजी करत पंकज सावंत याने ४ षटकात २४ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर संदीप वैती याने २, अंकित गांधी आणि राकेश पुतरन यांनी प्रत्येक एक विकेट घेतली. 

शेखर कदम चमकला 

कॅनरा बँकेच्या १२४ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना विकेटकीपर फलंदाज शेखर कदम याने नाबाद ४९ धावा केल्या.  त्याला कर्णधार परितोष मोहिते (१२), चिंतन गडा ( १८) राकेश पुतरन ( १७) तरूण कुंदनानी (१३)  धावांची साथ दिली. कॅनरा बँकेकडून नंदकिशोर याने दोन तर विवेक आणि किरण जाधव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी