International Olympic Day 2022: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आज, जाणून घ्या थीम, इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 23, 2022 | 10:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

International Olympic Day 2022 History | आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी २३ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणून साजरा केला जातो.

International Olympic Day Today, learn the theme, history and significance of this day
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आज, जाणून घ्या थीम आणि इतिहास   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी २३ जून रोजी साजरा केला जातो.
  • हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणून साजरा केला जातो.
  • यंदाच्या वर्षाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची थीम आहे ''एकत्रितपणे, शांत जगासाठी' अशी आहे.

International Olympic Day 2022 History | मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी २३ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस खेळ आणि आरोग्य यांना समर्पित म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा प्रमुख उद्देश्य खेळांचे महत्त्व वाढवणे आणि खेळ कसा जीवनाला नवीन आकार देऊ शकतो हे सांगणे आहे. लक्षणीय बाब म्हणजे प्रत्येक ४ वर्षांनंतर ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये जगभरातील हजारो ॲथेलीट सहभागी होतात. (International Olympic Day Today, learn the theme, history and significance of this day). 

अधिक वाचा : शिवसेना हा मूळ पक्ष आपल्या गटाकडे ठेवण्याचे शिंदेंचे प्रयत्न

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस

२३ जून १८९४ रोजी आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे आयोजन, प्रमोशन आणि नियमन करण्यासाठी १९८४ मध्ये सोर्बोन (पॅरिस) येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ची स्थापना करण्यात आली. आयओसी सदस्य डॉक्टर ग्रुस यांनी स्वीडनमधील स्कॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ४१ व्या हंगामात जागतिक ऑलिम्पिक दिनाची कल्पना मांडली होती. काही महिन्यांच्या कालावधीनंतर जानेवारी १९८४ मध्ये स्वित्झर्लंडच्या सेंट मॉरिट्झ येथील ४२ व्या आयओसी अधिवेशनात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यानंतर २३ जून १९४८ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांना या स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचा उद्देश वय, लिंग, वंश किंवा धर्म यांचा भेदभाव न करता जगभरातील खेळ आणि खेळांमध्ये लोकांच्या सहभागास प्रोत्साहन देणे हा आहे. हे लोकांना शारीरिक व्यायाम करण्यास प्रोत्साहित करते. यानिमित्ताने अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. याशिवाय ऑलिम्पिक खेळांविषयी प्रदर्शने आणि शैक्षणिक चर्चासत्रेही आयोजित केली जातात. एका शतकाहून अधिक काळानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी अनेक खेळांची भर पडली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनुसार, ऑलिंपिक दिवस तीन स्तंभांवर आधारित आहे - हाला, शिका आणि शोधा. दोन दशकांहून अधिक काळ, राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या १५० देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनी ऑलिम्पिक डे रन आयोजित करत आहेत. काही देशांमध्ये, शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करतात.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाची थीम

यंदाच्या वर्षाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची थीम आहे - ''एकत्रितपणे, शांत जगासाठी' (Together For A Peaceful World). हे लोकांना शांततेत एकत्र आणण्यासाठी खेळाची ताकद ओळखते. सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त #MoveForPeace आणि #OlympicDay अशा पोस्ट शेअर केल्या जातात. 

Summer and Winter Olympic Games Date - २०२४ आणि २०२६ मध्ये होणारे खेळ

पुढील उन्हाळी ऑलिंपिक गेम्स पॅरिस, फ्रान्स येथे २६ जूलैपासून सुरू होणार आहेत, जे ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालू राहतील. तसेच पुढील हिवाळी ऑलिंपिक खेळ २०२६ मध्ये इटलीमधील मिलान आणि कोर्टिना डी'अँपेझो येथे होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी