IPL 2019: आयपीएलच्या फायनल सामन्याच्या तारखेची घोषणा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 22, 2019 | 21:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IPL 2019 Final match: आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्याच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. कुठे आणि कधी होणार अंतिम सामना जाणून घ्या.

ipl 2019
आयपीएल २०१९  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: आयपीएल २०१९चा फायनल सामना कुठे आणि कधी होणार याची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. सुरूवातीला हा सामना चेन्नईमध्ये होणार होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या स्टेडियममधील तीन स्टँड्स खोलण्याची परवानगी देण्यात न आल्याने या सामन्याचे यजमानपद हैदराबादला देण्यात आले आहे. आयपीएलचा यंदाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये १२ मार्चला खेळवण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या हंगामाला २३ मार्चला सुरूवात झाली होती. आता ही स्पर्धा हळू हळू अखेरच्या टप्प्याच्या दिशेने प्रवास करत आहे. 

कुठे आणि कधी होणार प्लेऑफचे सामने

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये ७ ला पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार. तर विशाखापट्टणम येथे या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना ८ मेला खेळवला जाणार. दुसरा क्वालिफायरचा सामना १० मेला होणार आहे. खरंतर, एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर हैदराबादमध्ये होणार होता. मात्र लोकसभा निवडणुकामुळे हे शक्य झाले नाही. 

ipl schedule

ipl full schedule

इंडियन प्रीमियर लीगची ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी आठ संघ एकमेकांविरुद्ध लढत आहेत. रविवारी रात्रीपर्यंत या स्पर्धेतील ३९ सामने झाले. रविवारी रात्री चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगला. अखेरच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने एका रनने विजय मिळवला. या पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानावर कायम आहे तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयानंतरही आठव्या आणि अंतिम स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये कोणता संघ फायनल गाठणार हे तर आता सांगता येणार नाही मात्र अव्वल स्थानी विराजमान असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आपल्या घरच्या मैदानावर फायनल नसेल याचे दु:ख मात्र नक्कीच असेल. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादबद्दल बोलायचे झाल्यात जर ते फायनलमध्ये पोहोचले तर घरच्या मैदानावर अंतिम लढत खेळण्याची संधी त्यांना मिळू शकते.  

आयपीएलमधील सर्वात लांब षटकार

रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील सर्वात लांब षटकार ठोकला. हा षटकार तब्बल १११मीटर लांब होता. 

वादग्रस्त मंकड विकेट

किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान अश्विनने घेतली मंकड विकेट चांगलीच वादग्रस्त ठरली. राजस्थानचा जोस बटलर हा मंकड विकेटची शिकार ठरणारा पहिला फलंदाज ठरला. त्याला पंजाबच्या अश्विनने बाद केले होते. मात्र या विकेटनंतर अश्विनला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. या वादग्रस्त विकेटनंतर सोशल मीडियावरही अश्विनवर चांगलीच टीका झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IPL 2019: आयपीएलच्या फायनल सामन्याच्या तारखेची घोषणा Description: IPL 2019 Final match: आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्याच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. कुठे आणि कधी होणार अंतिम सामना जाणून घ्या.
Loading...
Loading...
Loading...