IPL 2021 Auction: आयपीएल 2021च्या लिलावात नवा इतिहास रचला गेला आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी सुरू असलेल्या लिलावात प्लेअर खरेदीचा सर्वात मोठा रेकॉर्ड बनला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस याला राजस्थान रॉयल्सच्या टीमने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांत खरेदी करत आपल्या टीममध्ये दाखल केलं आहे. यामुळे क्रिस मॉरिस हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
लिलावासाठी ज्यावेळी बोली सुरू झाली तेव्हापासून क्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी टीम्समध्ये चढाओढ पहायला मिळत होती आणि राजस्थान रॉयल्सने शेवटपर्यंत बोली लावत मॉरिसला आपल्या टीममध्ये सहभागी केलं.
यापूर्वी सर्वात महागडा प्लेअरचा रेकॉर्ड हा युवरजा सिंगच्या नावावर होता. 2015 साली दिल्लीच्या टीमने युवराज सिंगला 16 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, आता राजस्थान रॉयल्सने क्रिस मॉरिसला 16 कोटी 25 लाख रुपयांत खरेदी करत युवराजचा रेकॉर्ड मोडला आहे.
क्रिस मॉरिस हा जबरदस्त बॅटिंग करण्यासोबतच चांगली बॉलिंगही करतो. आयपीएलमध्ये क्रिस मॉरिस याने 70 मॅचेसमध्ये 80 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच टी-20 टूर्नामेंटमध्ये खेळताना त्याने आतापर्यंत 270 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिस मॉरिसला गेल्यावेळी 10 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या लिलावात मॉरिसला सर्वाधिक रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आले आहे. गेल्यावेळी पॅट कमिन्स याला 15 कोटी रुपयांच्या बोलीसह सर्वात महागडा परदेशी प्लेअर ठरला होता.