IPL2021 Auction: पंजाबच्या टीममध्ये शाहरुख खान; पहा कोण आहे हा ज्याच्यासाठी प्रिती झिंटाने मोजले 5 कोटी 25 लाख

Shahrukh Khan in IPL Auction: आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात शाहरुख खान याला प्रिती झिंटाने खरेदी करत आपल्या टीममध्ये दाखल केलं आहे. 

IPL 2021 Auction player Shahrukh Khan goes to Punjab Kings for Rs 5.25 cr
IPL 2021 Auction: पंजाबच्या टीममध्ये शाहरुख खान; जाणून घ्या कोण आहे हा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयपीएल 2021 साठी प्लेअर्सचा लिलाव
  • शाहरुख खानला खरेदी करण्यासाठी पंजाच्या टीमने मोजले 5 कोटी 25 लाख
  • पंजाबच्या टीमकडून आगामी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार शाहरुख खान

IPL 2021 Auction: आयपीएल 2021 च्या लिलावात अनेक रंजक गोष्टी घडल्याचं पहायला मिळत आहे. लिलावादरम्यान अशा एका नावाची घोषणा झाली जे ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. होय ते नाव होतं शाहरुख खान.... मात्र, हा शाहरुख खान म्हणजे बॉलिवडूचा अभिनेता शाहरुख खान नाही तर क्रिकेटर आहे ज्याचं नाव शाहरुख खान (Shahrukh Khan) आहे. या शाहरुख खानला प्रिती झिंटाने (Preity Zinta) आपल्या टीममध्ये दाखल केलं आहे. 

क्रिकेटर शाहरुख खान याची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळण्याची अपेक्षा करत होता. शाहरुख खानसाठी लिलावात बोली सुरू झाली आणि पंजाब किंग्सच्या टीमने शेवटपर्यंत बोली लावून शाहरुख खान याला खरेदी केलं. यासाठी पंजाबच्या टीमने 5 कोटी 25 लाख रुपये मोजले आहेत. शाहरुख खानला खरेदी करताच अभिनेत्री आणि पंजाब टीमची सह-मालक असलेल्या प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचं पहायला मिळालं. 

कोण आहे शाहरुख खान?

या 25 वर्षीय क्रिकेटरचं संपूर्ण नाव मसूद शाहरुख खान असे आहे. असं म्हटलं जात आहे की, त्याचे नाव बॉलिवूड स्टारच्या नावावर ठेवण्यात आले आहे. त्याचा जन्म 27 मे 1995 रोजी चेन्नईत झाला होता. राइट हॅण्ड बॅट्समन असलेला शाहरुख खान ऑफ स्पिन बॉलिंग सुद्धा करतो. त्याने फेब्रुवारी 2014 मध्ये तमिळनाडूच्या टीमकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत लिस्ट-ए करिअरची सुरुवात केली. 

यानंतर 2018-19 मध्ये शाहरुख खान याने रणी ट्रॉफीत खेळताना आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली. त्याने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी क्रिकेट मॅचेसमध्ये 231 रन्स केले आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 31 मॅचेस खेळत त्यामध्ये 293 रन्स केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी