अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमध्ये एन्ट्री, बहिण साराने लिहिला 'हा' खास संदेश

आयपीएल २०२१ च्या लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदा संधी मिळाल्याने बहिण सारालाही आनंद झाला आहे. साराने अर्जुनसाठी एक खास पोस्ट सुद्धा लिहिली आहे.

IPL 2021 Sara writes special post after brother arjun tendulkar bags Mumbai Indians
अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमध्ये एन्ट्री, बहिण साराने म्हटलं...  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मिळाली आयपीएलमधे  खेळण्याची संधी
  • मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात केले सामील
  • बहिण सारा तेंडुलकरने भावाच्या यशावर आनंद व्यक्त केला

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गुरुवारी आयपीएल २०२१ च्या लिलावात आयपीएलमध्ये पहिली संधी मिळवली. मुंबई इंडियन्सने वीस लाख रुपयांत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले. लिलावाच्या सुरूवातीला त्याच्या नावाची घोषणा झाली नव्हती तेव्हा असे वाटले की कदाचीत तो विकला जाणार नाही. परंतु, दिवसाच्या शेवटी त्याचे नाव झळकले. अर्जुन याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्यात त्याची बहिण सारा यांच्या शुभेच्छा विशेष होत्या.

अर्जुन तेंडुलकर मागील काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघाशी जोडलेला होता. अनेकदा तो सरावादरम्यान दिसला आहे. त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरही या संघाचे सल्लागार आहेत. त्यामुळे अर्जुन मुंबई इंडियन्समधेच सामील होणार हे स्पष्ट होते. तो आयपीएल २०२० दरम्यान संघासोबत यूएईलाही गेला होता.

Sara Tendulkar Instagram story

सचिन व त्याचे कुटूंब या लिलावाकडे लक्ष देऊन अर्जुनच्या नावाची वाट पाहत होते. त्याच्या नावाची घोषणा होताच बहिण सारा हिने इंन्स्टाग्रामवर अपला आनंद व्यक्त केला. साराने पोस्टमध्ये म्हटलं, ''तुझ्याकडून हे यश कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे फक्त तुझेच आहे."

अर्जुन तेंडुलकर एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. वेळ आल्यास फलंदाजीचेही कौशल्य तो दाखवू शकतो. त्याने जर आयपीएलमधे पदार्पन केलं तर, तो आयपीएल खेळणारा दुसरा तेंडुलकर असेल. सचिन तेंडुलकरने २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पन केले होते. २०११ पर्यंत तो या संघाचा कर्णधार होता. त्याने २०१३ ला आयपीएलचा शेवटचा सामना खेळला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी