IPL 2022 Auction: या खास खेळाडूंना संघात परत आणण्यासाठी लीगचे जुने ८ संघ पूर्ण बाजी लावणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 08, 2022 | 14:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 Auction | जगभरातील टी-२० ची सर्वात लोकप्रिय लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. दरम्यान आगामी २०२२ च्या आयपीएल हंगामासाठी आयपीएलमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ अशा दोन नवीन संघाचा समावेश झाला आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघात असेल या बाबतची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

  IPL 2022 Auction The old 8 teams of the league will make a full bet to bring these special players back in the team
या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी जुने ८ संघ प्रयत्नशील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगभरातील टी-२० ची सर्वात लोकप्रिय लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे.
  • आगामी २०२२ च्या आयपीएल हंगामासाठी आयपीएलमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ अशा दोन नवीन संघाचा समावेश झाला आहे.
  • १५ व्या हंगामासाठी यावेळी आयपीएलचा लिलाव सजणार आहे. तर लीगमधील ८ जुने संघ त्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील ज्या खेळाडूंना ते रिटेन करू शकले नाहीत.

IPL 2022 Auction | नवी दिल्ली : जगभरातील टी-२० ची सर्वात लोकप्रिय लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आपल्या १५ व्या हंगामाकडे (15th Season) कूच करत आहे. दरम्यान आगामी २०२२ च्या आयपीएल हंगामासाठी आयपीएलमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ अशा दोन नवीन संघाचा समावेश झाला आहे. (Ahmedabad And Lucknow IPl Team) त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघात असेल या बाबतची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मात्र तत्पुर्वी १५ व्या हंगामासाठी यावेळी आयपीएलचा लिलाव सजणार आहे. तर लीगमधील ८ जुने संघ त्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील ज्या खेळाडूंना ते रिटेन करू शकले नाहीत. त्यामुळे कोणता संघ आपल्या कोणत्या धुरंधर खेळाडूसाठी लिलाव प्रक्रियेत बाजी लावेल हे पाहण्याजोगे असेल. (IPL 2022 Auction The old 8 teams of the league will make a full bet to bring these special players back in the team).  

VIDEO:बेन स्टोक्स क्लीन बोल्ड तरीही राहिला NOT OUT

दिल्लीला हवाय गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan)

शिखर धवन मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने दिल्लीच्या संघाला सुरूवातीपासून चांगली सुरूवात करून दिली होती. लक्षणीय बाब म्हणजे दिल्लीच्या संघाला कित्येक वेळा धवनच्या शानदार खेळीच्या जोरावर विजय मिळाला आहे.

डेथ ओव्हर स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार  (Bhuvneshwar Kumar)

भुवनेश्वर कुमार मोठ्या कालावधीपासून सनरायझर्स हैदराबादसाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्टची भूमिका बजावत आला आहे. भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात साधारण गोलंदाजी केली असली तरी तो संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र हैदराबादच्या संघाने त्याला रिटेन केले नव्हते त्यामुळे आगामी आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत हैदराबादचा संघ भुवीला संघात कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.  

मोहम्मद शमी स्विंगचा बादशाह (Mohammed Shami)

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची गती आणि स्विंग यामुळे त्याची एक आक्रमण गोलंदाज म्हणून ओळख आहे. तो पंजाबच्या संघाच्या गोलंदाजीची एक महत्त्वाची बाजू आहे. शमी नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर बळी घेण्यात पटाईत आहे. शमीने आयपीएलच्या मागील हंगामात १४ सामन्यांत १९ बळी पटकावून पंजाबच्या संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळली होती. 

चहलच्या फिरकीवर फिदा आरसीबी (Yuzvendra Chahal)

युझवेंद्र चहलची एक चतुर फिरकीपटू म्हणून ओळख आहे. त्याच्याकडे कोणत्याही स्थितीत सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ जेव्हा जेव्हा कठिण स्थितीत सपडला आहे तेव्हा कर्णधाराने फिरकीपटू चहलवर विश्वास दाखवला आहे. तर लक्षणीय बाब म्हणजे चहल संघाच्या विश्वासावर देखील खरा ठरत आला आहे. त्यामुळे चहलची फिरकी आपल्याच संघात ठेवण्यासाठी आरसीबीचा संघ लिलावात बाजी लावेल. 

ऑलराउंडर हार्दिक पांड्या आहे मुंबईची ताकद (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या काही काळापासून गोलंदाजीतून लांब राहिला आहे. त्यामुळे त्याच्या ऑलराउंडर खेळीवर प्रश्व उपस्थित केले जात आहे. मात्र तो गोलंदाजीची तयारी करत असून त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात पुन्हा संधी मिळू शकते. हार्दिक पांड्या मुंबईच्या संघाची आक्रमक तोफ आहे. पांड्याने अनेक सामन्यात त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिले आहेत. 

 बेन स्टोक्सवर राजस्थान रॉयल्सची नजर (Ben Stokes)

इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सची पहिली पसंती असणार आहे. मागील हंगामात तो बोटाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्यांनी अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. पण लोकप्रिय ॲशेसमधून मालिकेतून त्याने क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन केले आहे. त्यामुळे स्टोक्स आता आयपीएलसाठीही तयार झाला आहे. 

शुभमन गिल केकेआरचा आक्रमक सलामीवीर ( Shubman Gill)

शुभमन गिलने मागील हंगामात कोलकत्ताच्या संघाकडून प्रत्येक कठिण स्थितीत शानदार खेळी खेळून स्वत:ला सिध्द केले आहे. गिलने प्रत्येक सामन्यात केकेआरच्या संघाला सुरूवातीपासूनच शानदार सुरूवात करून दिली आहे. शुभमन गिलने २०२१ च्या आयपीएल हंगामात १७ सामन्यांत ४७८ धावा केल्या होत्या. त्यामुळे आगामी हंगामात देखील शुभमन गिल आपल्या संघाचा सलामीवीर असण्यासाठी केकेआरचा संघ लिलावात बाजी लावेल. 

दीपक चाहर धोनीचा हुकमी एक्का (Deepak Chahar)

गोलंदाजीत दीपक चहर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस धोनीची पहिली पसंती आहे. नव्या चेंडूवर त्याच्यात आक्रमक आणि प्रभावी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. चाहरची जमेजी बाजू म्हणजे तो बळी पटकावण्यात माहिर आहे सोबतच तो धावांवरही नियंत्रण ठेवतो. तर चाहर प्रसंगी चांगली फलंदाजी देखील करतो. त्यामुळे सीएसकेचा संघ चाहरला आगामी लिलावात आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी