IPL 2022 Schedule : या तारखेपासून सुरू होऊ शकते आयपीएल १५, पहिल्या सामन्यात हे संघ भिडणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 07, 2022 | 13:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 schedulde: जसे अहमदाबादला लॅटर ऑफ इंटेट दिले जाईल यासोबतच ही घोषणाही होऊ शकते की लखनऊ आणि अहमदाबादचे संघ आपल्या तीन तीन खेळाडूंची घोषणा तेव्हाच करू शकतात.

ipl
IPL 2022 Schedule : या तारखेपासून सुरू होऊ शकते आयपीएल १५ 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयने आतापर्यंत मेगालिलावाच्या तारखांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
  • आयपीएल २०२२चे आयोजन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते
  • आयपीएलचे पहिले दोन सामने दोन एप्रिलला आयोजित केले जाऊ शकतात.

मुंबई: बीसीसीआय आयपीएल २०२२(ipl 2022)च्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, आतापर्यंत अहमदाबादच्या संघाला लॅटर ऑफ इंटेट दिले गेलेले नाही मात्र असे मानले जात आहे की अहमदाबादचे जे प्रकरण फसले होते ते आता सुधारले आहे. लवकरच या संघाला लॅटर ऑफ इंटेट दिले जाणार आहे. सोबतच अशी घोषणा केली जाऊ शकते की लखनऊ(lucknow) आणि अहमदाबादचे(ahmedabad) संघ आपल्या तीन तीन खेळाडूंची घोषणा तेव्हा करू शकतात. असे मानले जात आहे दोन्ही संघांची आपल्या तीन तीन खेळाडूंची गोष्ट पक्की झाली आहे. बीसीसीआयकडून हिरवा झेंडा मिळताच खेळाडूंच्या नावांचीही घोषणा केली जाणार आहे. आता सवाल असा आहे की आयपीएलची सुरूवात कधीपासून होणार आहे. Ipl 2022 can be start from this date

बीसीसीआयने आतापर्यंत मेगालिलावाच्या तारखांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आय़पीएल शेड्यूल्डतर नंतरची गोष्ट आहे. यात अशी बातमी समोर येत आहे की आयपीएल २०२२चे आयोजन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. क्रिकेटनेक्सच्या बातमीनुसार आयपीएलचे पहिले दोन सामने दोन एप्रिलला आयोजित केले जाऊ शकतात. २००९ पासून आतापर्यंत एखादे वर्ष सोडले तर अनेकदा सीझनमधील  पहिला सामना दोन्ही संघादरम्यान खेळले जातात जे गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये खेळलेले संघ असतात. 

आयपीएल २०२१ची फायनल एमएस धोनीच्या नेतृत्वात सीएसके आणि इयॉन मॉर्गन यांच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला होता. यात चेन्नईने शानदार खेळ करताना केकेआरला हरवत हा खिताब जिंकला होता. म्हणजेच या हंगामातील पहिला सामना सीएसके विरुद्ध केकेआर असा रंगू शकतो. सोबतच रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की पहिला सामना चेन्नईमध्ये खेळला जाऊ शकतो. 

आयपीएल २०२२च्या लीग मॅच दोन एप्रिलपासून सुरू होऊन २७ मे पर्यंत सुरू राहतील. लीग टप्प्यातील अखेरचा सामना केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होण्याची शक्यता आहे. हा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार असे बोलले जात आहे. यानंतर २९ मेला पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाऊ शकतो. हा सामना मुंबईत होऊ शकतो. यानंतर ३०मेला एलिमिनेटर सामना होऊ शकतो. हा सामनाही मुंबईत पार पडू शकतो. आयपीएल २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना एक जूनला चेन्नईमध्ये खेळवला जाऊ शकतो. यानंतर दोन फायनलिस्ट संघ मिळतील. यानंतर तीन जूनला आयपीएल २०२२चा फायनल सामना चेन्नईमध्ये खेळवला जाऊ शकतो. सोबतच आयपीएलचा नवा चॅम्पियनही मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी