मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या(indian premier league) पुढील हंगामाचे बिगुल वाजले आहे. यावेळी आयपीएलच्या आयोजनाआधी मेगा लिलाव(mega auction) होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने मेगा लिलावाला अंतिम रूप दिले आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून लिलावाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र क्रिकेट वेबसाईट क्रिकबजच्या रिपोर्टनुसार लिलावाच्या या तारखा फायनल आहेत.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाचे आयोजन १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. याआधी बातमी आली होती की लिलाव सात आणि आठ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र क्रिकबजने या बातमीला फेटाळले आहे.
अधिकतर संघाचे म्हणणे आहे की दर तीन वर्षांनी होणाऱ्या मेगा लिलावामुळे संघाचे संयोजन बिघडते. दिल्ली कॅपिटल्सचे सह मालक पार्थ जिंदाल यांनी म्हटले होते की टीम बनवण्यात इतकी मेहनत घेतल्यानंतर खेळाडूंना सोडून देणे खूप कठीण असते. त्यामुळे असे मानले जात आहे की आगामी मेगा लिलाव हा शेवटचा असू शकतो. यानंतर छोट्या स्तरावर लिलाव केला जाऊ शकतो.
दिल्ली कॅपिटल्सचे सह मालक पार्थ जिंदल म्हणाले हे पाहून मन उदास होते की ज्या खेळाडूंवर पैसा आणि वेळ खर्च केला जाणार होता तो तीन वर्षानंतर निघून जाणार. दिल्लीसाठी खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र जिंदल यांचे म्हणणे की हे टाळता आले असते. ते म्हणाले, श्रेयस अय्यर, शिखर धवन, कॅगिसो रबाडा आणि आर अश्विन यांचे संघातून जाणे मन उदास करणार होते. लिलावाी प्रक्रिया अशी बनलेली आहे. आणि मला वाटते की पुढे असेच दिसेल मात्र हे योग्य नाही. कारण आपण एक टीम बनवतो, युवा क्रिकेटर्सना संधी द्या. त्यांच्यासाठी एक सेटअप तयार करा आणि त्यांना संधी द्या. ते आपल्या फ्रेंचायझींसाठी खेळतील. नंतर आपल्या देशासाठी खेळतील आणि तीन वर्षानंतर तुम्ही त्यांना गमावणार.
यावेळी लिलावाचा व्याप हा मोठा आहे. यासाठी मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडूही सहभागी आहेत. आय़पीएल २०२२च्या लिलावात डेविड वॉर्नर, लोकेश राहुल, शिखर धवन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, रशीद खान, दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. फ्रेंचायझींना केवळ चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी होती मात्र उरलेले सर्व खेळाडू लिलावात जाणार.