IPL 2022 : आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या लीगच्या मेगा लिलावानंतर, सर्व तज्ञांनी गुजरात टायटन्सला IPL-2022 मधील सर्वात कमकुवत संघ म्हटले होते. संघात मोठे स्टार नसून फलंदाजीही कमकुवत असल्याचे सांगण्यात आले. आता हा संघ पदार्पणाच्या मोसमातच अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान या संघात कोणते असे मजबूत गोष्टी आहेत, ज्या गुजरातला पहिल्या सत्रातच अंतिम फेरीत पोहचवलं आहे, आपण अशा गोष्टींविषयी जााणून घेणार आहोत...
गुजरातच्या यशामागे संघाच्या नव्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या षटकातच विकेट मिळवून गुजरातने प्रतिस्पर्धी संघांवर दडपण आणले. या संघाने पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे 26 बळी घेतले.
गुजरातने फलंदाजीत जास्त धोका न पत्करता फलंदाजी करण्याचे धोरण आखले. त्यामुळेच या हंगामात संघाने केवळ 75 षटकार मारले आहेत. पण, चौकारांच्या बाबतीत गुजरात टॉप-3 मध्ये आहे. गुजरातने 207 चौकार मारले आहेत. या रणनीतीमुळे गुजरातने बहुतांश सामन्यांमध्ये एवढ्या धावा निश्चित केल्या की त्यांना शेवटपर्यंत झुंजता येईल. जेव्हा एखादा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात टिकून राहण्याचा आग्रह धरतो तेव्हा त्याच्या विजयाची शक्यताही जास्त असते. गुजरातने 8 सामन्यांत नंतर फलंदाजी केली आणि त्यापैकी सात जिंकले.
संघाच्या यशात त्याच्या गोलंदाजीचाही महत्त्वाचा वाटा आहे. धावसंख्येचा पाठलाग करणे किंवा बचाव करणे. संघाकडे नेहमी 7 गोलंदाजीचे पर्याय असतात.
जेव्हा-जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा एक ना एक खेळाडू पुढे आला आणि त्याने जबाबदारी स्वीकारली. अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला. क्वालिफायर 1 मधील प्रसिद्ध कृष्णाच्या 19 व्या षटकात मिलरचे लागोपाठ तीन षटकार असो किंवा तेवतियाची आरसीबीविरुद्ध 25 चेंडूत 43 धावांची खेळी. त्यानंतर राशिद खान आहे. ज्याने चेंडूसोबतच बॅटनेही कमाल दाखवली. राशिदने एलएसजीविरुद्धच्या 19व्या षटकात मार्को येसेनसनच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले होते. त्या षटकात संघाला विजयासाठी 22 धावा करायच्या होत्या.
या हंगामात हार्दिक पंड्यानेही आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे. त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी निर्णय घेऊन सामना जिंकवला आहे. त्याने मैदानावरील त्याच्या वागण्याकडे लक्ष दिले आणि त्याच्या आक्रमक स्वभावाऐवजी तो शांत दिसला. संघाच्या गरजेनुसार त्याने फलंदाजीची शैलीही बदलली.