आयपीएल २०२२ भारतात होणार

IPL 2022 will be played in India, confirms BCCI secretary Jay Shah आयपीएल २०२२ स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. हा आयपीएल स्पर्धेचा पंधरावा हंगाम असेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.

IPL 2022 will be played in India, confirms BCCI secretary Jay Shah
आयपीएल २०२२ भारतात होणार 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२ भारतात होणार
  • आयपीएल २०२२ होण्याआधी खेळाडूंच्या मेगा लिलावाचा कार्यक्रम होणार
  • बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली माहिती

IPL 2022 will be played in India, confirms BCCI secretary Jay Shah चेन्नईः आयपीएल २०२२ स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. हा आयपीएल स्पर्धेचा पंधरावा हंगाम असेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. याआधी आयपीएल २०२१ स्पर्धेची सुरुवात भारतात झाली. पण काही खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे आयपीएल काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. स्पर्धेचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते.

चेन्नई सुपरकिंग्सने आतापर्यंत झालेल्या चौदा आयपीएलपैकी चार आयपीएल जिंकल्या आहेत. यातील चौथी आयपीएल चेन्नईने २०२१ मध्ये जिंकली. या विजयाच्या निमित्ताने विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. चेन्नईचा कॅप्टन एम. एस. धोनी टीम इंडियाचा सल्लागार म्हणून काही दिवस व्यस्त होता. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली. नंतर भारताच्या टी २० टीमने न्यूझीलंड विरुद्धची तीन मॅचची मालिका जिंकली. यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्याला उपस्थित असताना जय शहा यांनी आयपीएल २०२२ स्पर्धेचे आयोजन भारतात होणार असल्याची माहिती दिली. आयपीएल २०२२ होण्याआधी खेळाडूंच्या मेगा लिलावाचा कार्यक्रम होणार असल्याचेही जय शहा म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी