IPL 2023: आयपीएलचा 16वा सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठ्या लीगसाठी आता फक्त 8 दिवस उरले आहेत. यावेळीही अनेक वर्षांप्रमाणे अनेक विक्रम होतील आणि तुटतील. कारण आयपीएलची ओळखच मुळात मसालेदार क्रिकेट अशी आहे. आलेला बॉल सीमेबाहेर पाठवायचा हे ठरलेलं असतं. पण तुम्हाला माहित आहे का की असेही 5 फलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत एकही षटकार मारलेला नाही.
या यादीत 2 दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. या 5 फलंदाजांनी आजपर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकही षटकार मारला नाही. आकाश चोप्रा, कॅमल फर्ग्युसन, मायकल क्लिंगर, शोएब मलिक, मायकल क्लार्क अशी या खेळाडूंची नावं आहेत. (IPL 2023: Batsmen list who did not hit sixes in IPL)
1. आकाश चोप्रा : कॉमेंट्री किंग अशी ओळख असलेल्या या भारतीय फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 45 च्या सरासरीने 10000 हून अधिक धावा केल्या आहेत. आकाश चोप्रा कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये दोन हंगाम खेळला आहे. यादरम्यान, त्याने एकूण 71 चेंडूंचा सामना केला आणि 75 च्या स्ट्राइक रेटने 53 धावा केल्या. यादरम्यान त्याला एकही षटकार मारता आला नाही.
अधिक वाचा: IPL 2022 Final: ऐकलं का! तब्बल एवढ्या लोकांनी IPL ची फायनल थेट मैदानातून पाहिली
2. कॅलम फर्ग्युसन : ऑस्ट्रेलियातून आलेला कॅलम फर्ग्युसन हा उजव्या हाताचा फलंदाज होता. त्याने एक कसोटी, 30 एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो आयपीएलमधील पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा भाग होता. या संघाकडून तो 2011 आणि 2012 मध्ये 9 सामने खेळला. यात त्याने 16 च्या सरासरीने 98 धावा केल्या, ही टी-20 मध्ये खराब आकडेवारी मानली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 98 धावांमध्ये त्याने एकही षटकार मारला नाही.
अधिक वाचा: IPL 2022 Final: गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनणे कठीण! किताब जिंकण्यासाठी बदलावा लागेल इतिहास
3. मायकेल क्लिंगर- कॅलम फर्ग्युसन प्रमाणेच मायकेल क्लिंगर देखील ऑस्ट्रेलियाहून आले आहेत. तरुण मुलं या खेळाडूला कदाचित ओळखणार नाहीत. कारण तो स्वतःच्याच देशासाठी फक्त 3 सामने खेळला. पण या दरम्यान त्याने आयपीएलमध्येही स्थान मिळवले. 2011 च्या हंगामात त्याला कोची टस्कर्स केरळने करारबद्ध केले होते आणि 4 सामने खेळला होता. या संघासाठी, क्लिंगरने 18.25 च्या सरासरीने आणि 94.81 च्या स्ट्राइक रेटने 73 धावा केल्या, ज्या दरम्यान त्याला एकही षटकार मारता आला नाही.
4. शोएब मलिक : पाकिस्तानच्या या खेळाडूने T20 मध्ये हजारो धावा केल्या आहेत. मलिक 2008 च्या मोसमात आयपीएल खेळला होता. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी 7 सामने खेळले पण आयपीएल स्पर्धेत त्याला एकही षटकार मारता आला नाही. 5 डावात त्याने 13 च्या सरासरीने केवळ 52 धावा केल्या.
अधिक वाचा: दिनेश कार्तिकला BCCIने दिली शिक्षा, पण IPLचा कोणता नियम तोडला ?
5. मायकेल क्लार्क : मायकेल क्लार्क हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज होता. 2012 च्या आयपीएल नंतर, पुणे वॉरियर्स फ्रँचायझीने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले, परंतु त्याने आयपीएलमध्ये फलंदाजी केली नाही. क्लार्कने त्या मोसमात फक्त 6 सामने खेळले आणि 94 चेंडूत 98 धावा केल्या. यादरम्यान त्याने एकही षटकार मारला नाही.