IPL 2023, CSK vs GT Playing 11: आयपीएलमधील पहिली मॅच, अशी असेल धोनीची प्लेइंग 11 अन् हार्दिक काढू शकतो हुकुमाचा एक्का

IPL 2023 Chennai Super Kings vs Gujarat Titans: आयपीएल 2023 ची सुरुवात 31 मार्च पासून होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिली मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. धोनीच्या नेत्रृत्वात सीएसकेची टीम मैदानात उतरणार आहे तर गुजरातच्या टीमचं नेत्रृत्व हार्दिक करणार आहे.

IPL 2023 CSK vs GT playing 11 team squad Gujarat Titans Chennai Super Kings read details in marathi
IPL 2023, CSK vs GT Playing 11: आयपीएलमधील पहिली मॅच, अशी असेल धोनीची प्लेइंग 11 अन् हार्दिक काढू शकतो हुकुमाचा एक्का (Photo: @IPL Twitter) 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलचा महासंग्राम 31 मार्च पासून होणार सुरू
  • पहिली मॅच गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार
  •  गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार पहिला सामना

IPL 2023; 1st Match GT vs CSK playing 11 team squad: आयपीएलच्या 16व्या सीझनची सुरुवात 31 मार्च पासून होत आहे. शुक्रवारी (31 मार्च) ओपनिंग सेरेमनी होईल आणि त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिली मॅच खेळवली जाणार आहे. धोनी आणि हार्दिक पांड्या एकमेकांसमोर असणार आहेत. गेल्या सीझनमध्ये दोन्ही टीम्समध्ये दोन मॅचेस झाल्या होत्या आणि दोन्ही मॅचेसमध्ये गुजरातच्या टीमने बाजी मारली होती. यावेळी आता कोण बाजी मारतं हे पहावं लागेल.

गेल्यावेळेचे चॅम्पियन्स गुजरात टायटन्सची टीम यंदाही आपल्या विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, पहिलीच मॅच अनुभवी धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या सीएसकेच्या टीमसोबत आहे त्यामुळे गुजरातसाठी विजय मिळवणं तितकं सोपं नसणार.

गुजरातच्या टीमकडे सुद्धा उत्तम प्लेअर्स आहेत जे कधीही मॅच पलटवू शकतात. गुजरातच्या टीमने केन विलियम्सनला मिनी ऑक्शनमध्ये खरेदी केलं आहे तर सीएसकेच्या टीमने बेन स्टोक्सला आपल्या टीममध्ये समाविष्ट केलं आहे.

हे पण वाचा : ही पेय करतात तुमची किडनी डिटॉक्स

केन विलियमन्सनला अनुभवाचा फायदा

गुजरातच्या टीमचा ओपनर बॅट्समन शुभमन गिल हा चांगल्या फॉर्मात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने सेंच्युरी झळकावली आहे. गेल्या सीझनमध्ये सुद्धा त्याने गुजरातच्या टीमसाठी उत्तम प्रदर्शन केलं होतं. तर गुजरातच्या टीममध्ये केन विलियम्सन आल्याने टॉप ऑर्डर अधिक मजबूत झाली आहे. मधल्या फळीत डेविड मिलर, मॅथ्यू वेड आणि राहुल तेवतिया यांचा समावेश आहे. तर बॉलिंगसाठी मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ यांच्यासारखे तगडे बॉलर्स आहेत. तसेच राशिद खान हा एक उत्तम स्पीनर आहे.

हे पण वाचा : ही ओषधी वनस्पती केसांना लावा अन् जादू पाहा

चेन्नईची टीमही मजबूत

चेन्नईच्या टीमसाठी गेला सीझन हा काही खास राहिला नाही. टीम चक्क 9व्या स्थानावर पोहोचली होती. मात्र, यंदाच्या सीझनमध्ये धोनीच्या नेतृत्वात टीम टूर्नामेंट जिंकण्यास उत्सुक आहे. टीममध्ये ऋतुराज आणि डेवोन कॉन्वे ओपनिंगसाठी आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अंबाती रायडू, मोईन अली आणि शिवम दुबे आहेत. मधल्या फळीत कॅप्टन महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा असतील. 

हे पण वाचा : असंख्य गुण असलेली शतावरी पुरुषांना देते जबरदस्त स्टॅमिना अन् पावर

Gujarat Titans Playing 11 गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11

शुभमन गिल, रिद्धिमान साहा, केन विलियमसन, डेविड मिलर, हार्दिक पांड्या, विजय शंकर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल

Chennai Super Kings Playing 11 चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग 11 

डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, दीपक चहर, मुकेश चौधरी, महेश तिक्ष्णा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी