IPL 2023 LIVE streaming Free: आता आयपीएल लाईव्ह स्ट्रिमिंग पाहा फ्री, जाणून घ्या कसे आणि कुठे? 

IPL 2023 LIVE: क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल म्हणजे एक पर्वणीच असते. क्रिकेट चाहत्यांना आयपीएल आता फ्री मध्ये पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या कसे...

ipl 2023 live streaming jio cinema
(Photo: IPL T20) 
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानींच्या कंपनीचा मेगा प्लान
  • क्रिकेटप्रेमींना मिळणार आयपीएल फ्री पाहण्याची संधी

IPL 2023 LIVE streaming on Jio Cinema : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मॅचेसचं फ्री प्रसारण करणार आहे. आयपीएल 2023 मधील पहिली मॅच गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 31 मार्च रोजी होणार आहे. ही मॅच अहमदाबाद येथे खेळली जाणार आहे. या आयपीएलचं लाईव्ह प्रसारण तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकणार आहात.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने नुकतेच जिओला आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची परवानगी दिली आहे. रिलायन्स जिओने याला दुजोरा दिला आहे. जिओ सिनेमावर तुम्ही फ्री मध्ये 4K Resolution (अल्ट्राएचडी) सह ऑनलाईन स्ट्रिमिंग पाहू शकता.

हे पण वाचा : अशा मुलींपासून चार हात लांबच रहा अन्यथा...

आतापर्यंत आयपीएल लाईव्ह स्ट्रिमिंगचे अधिकार Disney Hotstar कडे होते. मात्र, ज्यांनी सब्सक्रिप्शन घेतलं आहे तेच लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकत होते. पण आता जिओ सिनेमावर सर्वचजण आयपीएल मॅचेसचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकणार आहेत. 

हे पण वाचा : भारतातील सुंदर बेट, एकदा द्याल भेट तर प्रेमात पडाल

आयपीएल टेलिकास्ट 12 भाषांमध्ये

भारतात क्रिकेट मॅचचं प्रसारण हिंदी, इंग्रजी, तेलुगू, पंजाबी आणि तमिळ भाषांमध्ये होतं होतं. मात्र, यंदा आयपीएल 2023 टुर्नामेंट जवळपास 12 भाषांमध्ये होणार आहे. यामध्ये मराठी, गुजराती, भोजपुरी, उडिया, तेलुगू, तमिळ, कन्नड या भाषांचा समावेश आहे. युजर्स आपल्या सोयीनुसार भाषा निवडू शकणार आहेत.

हे पण वाचा : मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत?

याच्या व्यतिरिक्त स्क्रिनवर दिसणारी आकडेवारी सुद्धा तुम्ही आपल्या भाषेत पाहू शकणार आहात. जिओ सिनेमा Jio Cinema App युजर्स मोबाइल व्यतिरिक्त कम्प्युटर आणि स्मार्ट टीव्हीवर सुद्धा आयपीएलचं थेट प्रसारण पाहू शकणार आहेत. जिओ सिनेमाने यासाठी मेट्रो शहरांतील जवळपास 3 लाख सोसायटी, 10 हजार कॉलेजेस आणि 25 हजार रेस्टॉरंट्ससोबत टायअप केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी