IPL 2023 : आज इंडियन प्रीमियर लीगच्या(IPL)तिसरा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होत आहे. काइल मेअर्सच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर लखनऊने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. काइल मेअर्सने 73 धावांचे योगदान दिले. तर निकोलस पूरन याने हाणामारीच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. यासर्वात दिल्ली संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत आपल्या पाठिशी दिसला. अपघातात जखमी झाला आहे, उपचार घेत तरी तो कसा काय संघासोबत होता असं तुम्ही म्हणाल?
अधिक वाचा : तुमच्या या चुका खराब करतील लिव्ह-इन-रिलेशनशिप
बरोबर आहे! थोडं धीर धरा, दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे. पंतची कमी दिल्लीच्या संघाला नक्कीच जाणवत असेल, यात शंका नाही. पंत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्यासाठी दिल्लीच्या संघाने खास गोष्ट केली आहे. दिल्लीच्या संघाने पंतसाठी डगआऊटमध्ये जर्सी ठेवली आहे. त्याच्या नावाची जर्सीही डगआऊटमध्ये ठेवण्यात आली आहे. पंत सामन्यात नसला तरी तो संघासोबत आहे, असा संदेश दिल्लीच्या संघाने दिला.दिल्लीच्या संघाने केलेला हा आदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अधिक वाचा : ऑफिसमधील सहकाऱ्यासह प्रेम जुळणं आहे धोक्याचं
दरम्यान, 2022 डिसेंबरमध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली आहे. पंत पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद हे डेविड वॉर्नरकडे सोपविण्यात आलं आहे. पंत सामना खेळत नसला तरी आपल्या सोबत संघासोबत आहे, हे सांगण्यासाठी दिल्लीच्या संघाने त्यांची 17 नंबरची जर्सी डगआऊटमध्ये ठेवली आहे.
अधिक वाचा :रविवार खर्चीक ठरेल की धनलाभाचा, पाहा तुमचे भविष्य
सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चाहत्यांसाठी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांना दिल्लीची प्लेईंग 11 कशी असेल.. याबाबत विचारण्यात आले होते. या ट्विटला रिप्लाय देताना पंत म्हणाला की, मी संघाचा 13 वेळा खेळाडू आहे. पंतने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘ इम्पैक्ट नियमानुसार मी 13 वा खेळाडू आहे, नाहीतर 12 वा खेळाडू झाला असतो. ’
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्न म्हणाला की, ऋषभ पंत दुखापतीतून सावरत आहे. तो नसल्यामुळे मला संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.. लवकरच लवकर दुखापतीवर मात करुन मैदानावर परत यावे.
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, रिले रोसौव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार.
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय दिल्लीसाठी घातक ठरला. कारण लखनऊने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. काइल मेअर्सच्या फटकेबाजीसमोर दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. दिपक हुड्डासोबत मेर्सने 80 धावांची भागिदारी केली. काइल मेअर्स याने अवघ्या 38 चेंडूत 73 धावांचा पाऊस पाडला.