IPL 2023 live streaming free: मोबाइलवर फ्री पाहता येणार आयपीएल मॅचेस, जाणून घ्या कसे

TATA IPL 2023 LIVE streaming and Telecast Channel: आयपीएलच्या नव्या सीझनला सुरुवात होत आहे. या आयपीएल मॅचेसचं तुम्ही लाईव्ह स्ट्रिमिंग मोबाइलवर अगदी फ्री मध्ये पाहू शकणार आहात. जाणून घ्या कसे....

IPL 2023 match live streaming free on jio cinema how to watch telecast read in marathi
IPL 2023 live streaming free: मोबाइलवर फ्री पाहता येणार आयपीएल मॅचेस, जाणून घ्या कसे (Photo: @JioCinema Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • 31 मार्चपासून आयपीएल 2023 चा महासंग्राम
  • आयपीएल मॅचेसचा आनंद मोबाइलवरुन घ्या अगदी फ्री फ्री फ्री...

IPL 2023 match live streaming free on mobile: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. आयपीएलच्या सर्व मॅचेसचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही मोबाइलवर अगदी फ्री मध्ये पाहू शकणार आहात. शुक्रवार 31 मार्च रोजी आयपीएलमधील पहिली मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ही मॅच होणार आहे. (IPL 2023 match live streaming free on jio cinema how to watch telecast read in marathi)

How to watch IPL match live streaming free

आयपीएल 2023 च्या सर्व मॅचेस मोबाइलवर कशा पाहता येतील?

आयपीएलच्या 16व्या सीझनमधील सर्व मॅचेस जिओ सिनेमा (Jio Cinema) वर फ्रीमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहेत. जिओ सिनेमा यंदाच्यावर्षी 4K फीड, मल्टी लॅंग्वेज आणि मल्टी कॅम प्रेजेंटेशन, स्टेट्स पॅकच्या माध्यमातून सादर करत आहे. जिओ सिनेमा हा IPL 2023 चा ऑफिशिअल लाईव्ह स्ट्रिमिंग पार्टनर आहे. 

वाचा : आयपीएलचा महासंग्राम; कधी, कुठे आणि कोणत्या टीम्सची मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् LIVE Streaming

How to watch IPL Match on Laptop or computer

तुम्हाला फ्री मध्ये आयपीएल मॅचेस पहायच्या असतील तर याचे आणखी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे जिओ सिनेमा Jio Cinema App डाऊनलोड करावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे जिओ सिनेमाच्या वेबसाईटवरुन तुम्ही मॅच पाहण्याचा आनंद घेऊ शकता. 

हे पण वाचा : IPL 2023: कधी, कुठे आणि कोणाची मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल टेलिकास्ट 12 भाषांमध्ये

भारतात क्रिकेट मॅचचं प्रसारण हिंदी, इंग्रजी, तेलुगू, पंजाबी आणि तमिळ भाषांमध्ये होतं होतं. मात्र, यंदा आयपीएल 2023 टुर्नामेंट जवळपास 12 भाषांमध्ये होणार आहे. यामध्ये मराठी, गुजराती, भोजपुरी, उडिया, तेलुगू, तमिळ, कन्नड या भाषांचा समावेश आहे. युजर्स आपल्या सोयीनुसार भाषा निवडू शकणार आहेत.

हे पण वाचा : ही पेय करतात तुमची किडनी डिटॉक्स

स्टार स्पोर्ट्स चॅनल्सवर मॅच

IPL 2023 च्या मॅचेस टीव्हीवर ब्रॉडकास्ट करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुले टीव्हीवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या सर्व मॅचेसचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनल्सवरुन होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 4K मध्ये GT vs CSK मॅचचं लाईव्ह ब्रॉडकास्ट अल्ट्रा हाय डेफिनिशन (4K) मध्ये होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी