IPL 2023 Retained-Released players : कोणत्या संघाने कोणत्या भिडूला सोडलं अनं कोणत्या खेळाडूंसोबत बनवली टीम; जाणून घ्या सर्व रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी

IPL 2023 Retained players: आपला आवडता खेळाडू आधीच्याच संघात दिसेल का नाही याची माहिती करुन घेण्यास आपण सर्वजण उत्सुक आहोत. चला तर जाणून घेऊया कोणत्या खेळाडूंना कोणत्या संघाने रिटेन केलंय. दरम्यान आयपीएलमधल्या 10 टीम्सनी काही खेळाडूंना (players) रिटेन (retained) केले आहे.

IPL 2023 : Know All Retained and Released Players List
IPL 2023 : जाणून घ्या सर्व रिटेन अन् रिलीज खेळाडूंची यादी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.
  • सनरायझर्स हैदराबादने कर्णधार असलेल्या खेळाडूलाच सोडलं.
  • मुंबई इंडियन्सने तब्बल 13 खेळाडूंना डच्चू दिला आहे.

मुंबई:  धमाकेदार टी 20  विश्वचषक (T20 World Cup) संपल्यानंतर क्रिकेटर्स (Cricketers) आणि क्रिकेटप्रेमींना आता आयपीएल 2023 (IPL 2023) वेध लागले आहेत. दरम्यान 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी संघांनी आप-आपले खेळाडू निश्चित केले आहेत. मंगळवारी 15 नोव्हेंबरला खेळाडूंना रिटेन करण्याची मुदत संपली आहे. यामुळे आपला आवडता खेळाडू आधीच्याच संघात दिसेल का नाही याची माहिती करुन घेण्यास आपण सर्वजण उत्सुक आहोत. चला तर जाणून घेऊया कोणत्या खेळाडूंना कोणत्या संघाने रिटेन केलंय.दरम्यान आयपीएलमधल्या 10 टीम्सनी काही खेळाडूंना (players) रिटेन (retained) केले आहे. तर काही खेळाडूंना रिलीज केले आहे. तर कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. पोलार्ड मैदाना गोलंदाजी आणि मोठे षटकार मारताना दिसणार नसेल तरी उत्तुंग षटकार कसा मारायचा हे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंना सांगणार आहे.  (IPL 2023 Retained-Released players: Which team released which player and with which players made their team)

अधिक वाचा  : लोहरस कामगारांवर पडून मोठी दुर्घटना, 8 जण होरपळले

SRH म्हणजेच सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू

अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, फजलाक फारूखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक.

कोणत्या खेळाडूंना सोडलं 

केन विलियमसन, निकोलस पूरन.

चेन्नई सुपर किंग्सनं  रिटेन केलेले खेळाडू

एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, डेवन कॉनवे, मोइन अली, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सैंटनर, महीष पथिराना, सुभ्रांशू सेनापती.

 रिलीज केलेले खेळाडू

ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, एन जदगीशन, हरी निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, रॉबिन उथप्पा.

पंजाब किंग्जने रिटेन केलेले खेळाडू

शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे, प्रभसिमरन सिंह, शाहरुख खान, लियम लिविंग्सटन, हरप्रीत बराड़, राज बावा, ऋषि धवन, अर्थव ताइदे, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, राहुल चाहर, नाथन एलिस, बलतेज सिंह.

रिलीज केलेले खेळाडू

मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोड़ा, बेनी होवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, रितिक चॅटर्जी.

अधिक वाचा  : ठाकरे गटाला खिंडार पडत चाललंय : गिरीश

केकेआरचे (कोलकाता नाईट रायडर्स) रिटेन खेळाडू

श्रेयस अय्यर, गुरबाज, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नीतीश राणा, अनुकूल रॉय, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकुर, टिम साउदी, लॉकी फर्गुसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

 केकेआरचे रिलीज खेळाडू

शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, एरॉन फिंच,

लखनऊने सुपर जायंट्सचे रिटेन केलेले खेळाडू

केएल राहुल, आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णाप्पा गौतम, दीपक हु्ड्डा, काइल मायेर्स, क्रुणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, रवि बिश्नोई.

रिलीज केलेले खेळाडू

एंड्रयू टाई, अंकित राजपूत, दुश्मंथा चामीरा, एविन लुइस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम

अधिक वाचा  : ऐतिहासिक घटना, मनिलात जन्मलेल्या चिमुकलीची जगभर चर्चा

दिल्लीने रिटेन केलेले खेळाडू

ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोव्हमॅन पॉवेल, सर्फराज अहमद, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि विकी ओस्तवाल.

दिल्लीचे रिलीज खेळाडू 

शार्दुल ठाकुर, टिम सायफर्ट, अश्विनी हेब्बार, श्रीकर भरत, मनदीप सिंह.

 राजस्थान रॉयल्सचे रिटेन खेळाडू

संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मेकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा.

राजस्थान रॉयल्सचे रिलीज खेळाडू

अनुनय सिंह, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, करुण नायर, नाथन कूल्टर नाइल, रासी वेन डर दुसां, शुभम गढ़वाल, तेजस बरोका.

 रिटेन खेळाडू

फाफ डु प्लेसी, विराट कोहली, सुयश प्रभूदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मैक्सवेल, वानिंदु हसारंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड़, मोहम्मद सिराज, जॉश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

रिलीज केलेले खेळाडू

जेसन बेहरनडॉर्फ, अनीश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनिथ सिसोदिया, शेरफाने रदरफोर्ड

अधिक वाचा  : स्टेट बॅंक ग्राहकांना देतेय 35 लाखांचा फायदा, पाहा कसे

GTचे (गुजरात टायटन्स) रिटेन खेळाडू

हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेविड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अलजारी जोसफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, जयंत यादव, साई किशोर आणि नूर अहमद

गुजरात टायटन्सचे रिलीज खेळाडू

रहमनुल्लाह गुरबाज, लॉकी फर्गुसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंह, जेसन रॉय आणि वरुण एरॉन

 मुंबई इंडियन्सचा तब्बल 13 खेळाडूंना डच्चू 

 सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईने रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.   पोलार्ड या मोसमापासून मुंबईचा बॅटिंग कोच म्हणून काम पाहील. या मोसमाआधी मुंबईने तब्बल 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे.

मुंबईने रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमनदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, ऋतीक शौकीन, जेसन बेहरनडॉर्फ, आकाश मढवाल.

मुंबईने रिलीज केलेले खेळाडू

कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बसील थंपी, डॅनियल सॅम्स, फॅबियन एलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव, टायमल मिल्स.


 


 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी