IPL 2023 Schedule : IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर:गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना; अशा होतील Matches

IPL 2023 Schedule : आयपीएल (IPL)म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक (Schedule) जाहीर झाले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाहहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. अ

IPL 2023 Schedule : IPL 2023 Schedule Announced
IPL 2023 Schedule : IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • एका दिवसात 18 वेळा 2 सामने होतील.
  • मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दोन एप्रिलला होणार आहे.
  • पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार

IPL 2023 Schedule : आयपीएल (IPL)म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक (Schedule) जाहीर झाले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाहहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या ( Ahmedabad)नरेंद्र मोदी स्टेडियमवर   (Narendra Modi Stadium) हा सामना होणार आहे. तर अंतिम सामना हा 28 मे रोजी  होणार आहे.  (IPL 2023 Schedule : IPL 2023 Schedule Announced: First Match Between Gujarat and Chennai)

अधिक वाचा  : तुमच्या या सवयी तुमच्या मुलांना बिघडू शकतात

तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दोन एप्रिलला होणार आहे. 1 एप्रिल रोजी पंजाब-कोलकाता आणि लखनऊ-दिल्ली यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्याचवेळी, 2 एप्रिल रोजी सनरायझर्स-राजस्थान यांच्यात पहिला सामना आणि दुसरा सामना बेंगळुरू-मुंबई यांच्यात होणार आहे. 8 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या 16 व्या सत्रात 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगतील त्यानंतर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल.  

अधिक वाचा  : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी

58 दिवसांत 74 सामने होतील

58 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. एक संघ 14 सामने खेळणार आहे. 10 संघांमध्ये लीग टप्प्यातील 70 सामने होतील. लीग स्टेजनंतर, पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

18 वेळा होतील दोन सामने 

स्पर्धेत एकूण 18 डबल हेडर असतील, म्हणजेच एका दिवसात 18 वेळा 2 सामने होतील. या दरम्यान, पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि दुसरा सामना 7:30 वाजता सुरू होईल. 31 मार्च रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना, आणखी त्यानंतर एक सामना होईल. तर 2 एप्रिलला दोन डबल हेडर सामने होतील.

अधिक वाचा  : काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं

3 वर्षांनंतर सामने होम-अवे फॉरमॅटमध्ये होणार आहेत

कोरोना विषाणूच्या साथीमुळे 2020 मध्ये, IPL चा अर्धा हंगाम भारतात आणि अर्धा UAE मध्ये आयोजित करावा लागला होता. तर 2021 चा हंगाम देखील फक्त UAE मध्ये खेळला गेला. गेल्या हंगामातील 70 लीग सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात बांधलेल्या 4 स्टेडियममध्ये खेळले गेले. त्यानंतर कोलकाता आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफचे सामने झाले.

यावेळीही 2019 च्या हंगामाप्रमाणे सर्व सामने होम आणि अवे फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. म्हणजेच, स्पर्धेतील सर्व संघ साखळी टप्प्यातील 14 पैकी 7 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर खेळतील. प्लेऑफचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील.

आयपीएलमधील ग्रुप 

दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.  

कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने

- अहमदाबाद
- मोहाली
- लखनौ
- हैदराबाद
- बेंगलोर
- चेन्नई
- दिल्ली
- कोलकाता
- जयपूर
- मुंबई
- गुवाहाटी
- धर्मशाला

मागील चॅम्पियन गुजरात टायटन्स 

2022 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्सच्या संघांचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. या संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करुन विजेतेपद पटकावले. पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपद पटकावणारा गुजरात हा दुसरा संघ ठरला. त्याआधी 2008 मध्ये राजस्थानचा संघ चॅम्पियन बनला होता.

मुंबई-चेन्नई सर्वात यशस्वी संघ

मुंबई इंडियन्स हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने 5 IPL विजेतेपदे जिंकली आहेत. त्याचवेळी चेन्नई सुपरकिंग्ज या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या कर्णधारपदी CSK ने 4 IPL विजेतेपदे जिंकली आहेत. कोलकाताने 2 आणि हैदराबाद, राजस्थान, गुजरात आणि डेक्कन चार्जर्स (2009) यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी