Shami 100th IPL Wicket : अहमदाबाद: गुजरातचा (Gujarat) वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने चेन्नईचा (Chennai) सलामी फलंदाज डेव्हॉन कॉन्वेला (Devon Conway) बाद करत खास विक्रम केला आहे. शामीचा चेंडू कॉन्वेला समजला नाही. या विकेटसह शामीने आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. कॉन्वेला बाद केलेला शामीचा चेंडूने अनेकांचे लक्ष वेधले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Shami knocks out Conway to score a special century in IPL; Seeing the bold, you will say wow, what a ball)
अधिक वाचा : ऑफिसमधील सहकाऱ्यासह प्रेम जुळणं आहे धोक्याचं
आयपीएल 2023 ची पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरूवात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी केली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने चेन्नईला पहिला धक्का दिला. गुजरातकडून तिसऱ्या ओव्हरमध्ये शमीने डेव्हॉन कॉन्वेचा त्रिफळा उडवला. शमीचा चेंडू इतका वेगवान होता की पीचवर पडला आणि थेट स्टंपचा वेध घेतला. डेव्हॉन कॉन्वेला चेंडू समझण्याआधीच त्याची विकेट पडली होती. 6 चेंडूत फक्त 1 धाव करता आली. कॉन्वेच्या या विकेटसह मोहम्मद शमीने आयपीएलमधील 100 विकेटचा टप्पा पार केला.
अधिक वाचा : धूम्रपान करणे डोळ्यांसाठीही धोक्याचे
यंदाच्या सीझनमध्ये धोनीने संघात ऋतुराज गायकवाड आणि राज्यवर्धन हंगरगेकर या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंना अंतिम 11 मध्ये स्थान दिले. राज्यवर्धन हा तुळजापूरचा आहे तर ऋतुराज पुण्याचा आहे. वयाच्या २१व्या वर्षी चेन्नईकडून राज्यवर्धनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. चेन्नईकडून पदार्पण करणारा तो चौथ्या क्रमांकाचा युवा खेळाडू आहे.
चेन्नईची प्लेईंग 11
डेवेन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, अंबाती रायडू, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगारकेरकर
गुजरातची प्लेईंग 11 -
शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकिपर), केन विल्यमसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शामी, जोश लिटिल, अल्जारी जोसेफ, यश दयाल