IPL 2022: या स्टार खेळाडूला संघात घेण्यासाठी आता चेन्नई करणार प्रयत्न

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 03, 2021 | 20:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL Retention 2022 : चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला रिटेन केले. दरम्यान, एका दिग्गज स्टारला त्यांनी रिलीज केले. 

chennai super kings
या स्टार खेळाडूला संघात घेण्यासाठी आता चेन्नई करणार प्रयत्न 
थोडं पण कामाचं
  • CSK टीमने ४ खेळाडूंना रिटेन केले
  • चेन्नई टीमने एका परदेशी खेळाडूला रिटेन केले. 
  • मेगा लिलावात दिग्गज खेळाडूला संघात घेणार

IPL Auction 2022 ।  मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) २०२२च्या मेगा लिलावाआदी सर्व फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन खेळाडूंची(retain player list) लिस्ट तयार केली आहे. बीसीसीआयच्या(bcci) नियमानुसार एक संघ जास्तीत जास्त ४ खेळाडूंना रिटेन करू शकते. अशातच बऱ्याच संघांना आपल्या संघातील काही दिग्गज खेळाडूंना सोडावे लागले. यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात(ms dhoni) खेळणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघही(chennai super kings) आहे. CSK will try to retain faf du plesis in team during mega auction of ipl

चेन्नईने धोनीसह रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना रिटेन केले आहे. दरम्यान, त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिसला रिलीज केले. प्लेसिस गेल्या दोन हंगामात शानदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या हंगामाच फाफने शानदार खेळ केला होता. अशातच मेगा लिलावात चेन्नईचा संघ प्लेसिसला पुन्हा संघात घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार. ही बाब फ्रेंचायझीचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितली. 

Also Read : ​विराट कोहली खराब अंपायरिंगचा ठरला बळी, काढला राग

प्लेसिसला पुन्हा संघात घेण्याचा प्रयत्न

काशी विश्वनाथने चेन्नईच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे. यात त्याने सांगितले की फाफ डू प्लेसिसला पुन्हा संघात घेण्याचा प्रयत्न केला जाईल. प्लेसिस असा खेळाडू आहे जो संघाला फायनलपर्यत घेऊन गेला होता. गेले दोन हंगाम त्याच्यासाठी खूप खास होते. त्याला संघात घेण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. मात्र आमच्या हातात काही नाही. दरम्यान, आमच्या शुभेच्छा नेहमीच त्याच्यासोबत आहेत. तो ज्या संघासोबत असेल तेथे त्याने शानदार खेळ दाखवावा. आशा करतो की २०२२ हा हंगाम चांगला असेल. 

Also Read : Yahoo's list: गुगल सर्चवर पुन्हा एकदा विराटचा दबदबा

गेल्या हंगामातील हिरो गायकवाड-प्लेसिस

गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाडने १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६३५ धावा केल्या होत्या. त्याला ऑरेंज कॅप मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर फाफ डू प्लेसिसचा नंबर होता. प्लेसिसने १६ सामन्यांमध्ये ६३३ धावा ठोकल्या होत्या. दोघांनी मिळून चेन्नईला चॅम्पियन बनवले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी