IPL Auction: CSK कर्णधारपद विदेशी खेळाडूच्या हातात जाणार? आयपीएल लिलावातच दिसले संकेत

IPL Auction: आयपीएलमध्ये बॉस ठरणारा महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर सीएसकेचा कर्णधार कोण असेल यावर अनेक तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. अशात लिलावात मोठी बोली लावून सीएसकेने स्टोक्सला आपल्या ताफ्यात जोडले आहे. याचाच अर्थ त्यांच्या अंगावर सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली जाईल अशी चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.

CSK captaincy to go to a foreigner player?
IPL Auction: CSK कर्णधारपद विदेशी खेळाडूच्या हातात जाणार?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मोठी बोली लावून सीएसकेने स्टोक्सला आपल्या ताफ्यात जोडले आहे.
  • कोच्चीमध्ये आयपीएल 2023 साठी लिलाव करण्यात आला.
  • सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टोक्सकडे जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली :  आयपीएल (IPL)मधील सर्वात यशस्वी दुसरा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स  (CSK).या संघाने मिनी ऑक्शन 2023 (Mini Auction 2023) मध्ये बेन स्टोक्सवर (Ben Stokes) 16.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला खरेदी केलं. लिलावापूर्वीच इंग्लंड संघाचा (England team)अष्टपैलू खेळाडू (All-rounder) बेन स्टोक्सची बरीच चर्चा झाली होती. स्टोक्सवर विकत घेण्यासाठी CSK आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात चुरशीची लढत झाली, पण सीएसकेने लिलावात विजय मिळवत त्याला आपल्या संघात जोडलं.  बेन स्टोक्स सीएसकेच्या संघात आल्यानंतर लगेच एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे सीएसकेचं कर्णधारपद देखील या खेळाडू जाईल. (CSK captaincy to go to a foreigner player? Clues were seen in the IPL auction)

आयपीएलमध्ये बॉस ठरणारा महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर सीएसकेचा कर्णधार कोण असेल यावर अनेक तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. अशात लिलावात मोठी बोली लावून सीएसकेने स्टोक्सला आपल्या ताफ्यात जोडले आहे. याचाच अर्थ त्यांच्या अंगावर सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली जाईल अशी चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान, कोच्चीमध्ये आयपीएल 2023 साठी लिलाव करण्यात आला. यात अनेक खेळाडूंचे नशीब उजळले आहे. तर काही जुन्या अनुभवी खेळाडूंवर मात्र कमी बोली लागली. या लिलावात चेन्नई सुपर किंग्स (CSK)ने  इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा आपल्या संघात समावेश केला. सीएसकेने स्टोक्सवर 16.25 कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील केले.

 बेन स्टोक्स कर्णधार होऊ शकतो

स्टोक्स आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू राहिला होता. स्टोक्सने 2017 मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली आणि सीझनमध्ये, बेनने 316 सोबत 12 विकेट घेतल्या, परंतु 2018 च्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात समाविष्ट केले. स्टोक्सने 2022 मध्ये आपले नाव मागे घेतले होते, अशा परिस्थितीत स्टोक्स 2023 मध्ये नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे.  या असा अंदाज वर्तवला जात आहे की, स्टोक्सला सीएसकेच्या संघात घेण्यामागे महेंद्रसिंग धोनीची इच्छा होती, कारण धोनीने आयपीएलमधून संन्यास घेतला आहे. यामुळे या संघाचा कर्णधारपदी कोणीच असा प्रबळ दावेदार नाहीये. यामुळे स्टोक्सला संघात घेऊन त्याला कर्णधार बनवलं जाण्याची शक्यता आहे. 

बेन स्टोक्सची आयपीएल कारकीर्द 

बेन स्टोक्सच्या करिअरवर आपण नजर टाकली तर बेनची दमदार खेळी आपले लक्ष खेचून घेते.  बेनने आयपीएलमध्ये एकूण 43 सामने खेळत 920 धावा केल्या आहेत.  या धावा 25.56 च्या सरासरीने केल्या आहेत. यासाठी त्याचा स्ट्राइक रेट 134.50  आहे.  याशिवाय त्याने 28 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने इंग्लंडसाठी 89 कसोटी, 105 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी