IPL Media Rights: आता या टीव्ही चॅनेलवर दिसणार IPL मॅचेस, बीसीसीआयने तोडले कमाईचे रेकॉर्ड्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 14, 2022 | 20:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL Media Rights: आयपीएलचे मीडिया राईट्स ४८,३९० कोटी रूपयांना विकले गेले आहे. 

IPL
IPL Media Rights: आता या टीव्ही चॅनेलवर दिसणार IPL मॅचेस 
थोडं पण कामाचं
  • आयपीएल मीडिया राईट्सचे पॅकेज ए स्टार स्पोर्ट्सने २३,५७५ कोटी रूपयांना खरेदी केले आहे.
  • पॅकेज बी ला वायकॉम १८ने २०,५०० कोटी रूपयांना खरेदी केले.
  • आता प्रेक्षक स्टार स्पोर्ट्सवर मॅच पाहू शकणार.

मुंबई: आयपीएल(ipl_ ही जगभरात सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. येथे खेळत अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी आपले करिअर बनवले आहे. येथे प्रत्येकाचे खेळण्याचे स्वप्न असते. आता इंडियन प्रीमियर लीगच्या टीव्ही(tv) आणि डिजीटल मीडिया राईट्ससाठी(digital media rights) खूप मोठी बोली पाहायला मिळाली. इंडियन प्रीमियर लीगने याबाबतीत इतिहास रचला आहे. पुढील पाच वर्षांसाठी मीडिया राईट्स तब्बल ४८,३९० कोटी रूपयांना विकले गेले आहेत. IPL matches will be seen on this tv channel

अधिक वाचा - ऑनलाइन सट्टेबाजी विरोधात केंद्राची पावले

या कंपन्यांनी मारली बाजी

आयपीएल मीडिया राईट्सचे पॅकेज ए स्टार स्पोर्ट्सने २३,५७५ कोटी रूपयांना खरेदी केले आहे. पॅकेज ए मध्ये टीव्हीचे राईट्स होते. तर पॅकेज बी ला वायकॉम १८ने २०,५०० कोटी रूपयांना खरेदी केले. पॅकेज बीमध्ये डिजीटल राईट्स आहेत. आता प्रेक्षक स्टार स्पोर्ट्सवर मॅच पाहू शकणार. तसेच मोबाईल अथवा लॅपटॉपवर पाहायचे असल्यास प्रेक्षकांना VOOT डाऊनलोड करावे लागेल. कारण डिजीटल राईड्स वायकॉम १८कडे आहेत. 

पॅकेज सी आणि डी या कंपनीला मिळाले

पॅकेज सीला वायकॉमने ३२५८ कोटींना खरेदी केले. तर पॅकेज सीमध्ये प्लेऑफ सामन्यांचे मीडिया राईट्स सामील आहेत. तर पॅकेज डीला वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेटमे मिळून खरेदी केले आहे. यात भारताच्या बाहेर सामने दाखवण्याचे राईट्स सामील आहेत. 

अधिक वाचा - हे ऑप्टिकल इल्युजन दाखवते तुमची सर्वात मोठी कमकुवत बाजू

दुसरी सगळ्यात महागडी लीग

बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले आयपीएलच्या स्थापनेनंतर ही लीग लोकप्रिय आहे. आयपीएलच्या इतिहासातील आज मोठा दिवस आहे. पुढील पाच वर्षांसाठी मीडिया राईट्स ४८,३९० कोटी रूपयांना विकले गेलेत. यासोबतच आयपीएल आता जगातील दुसरी सगळ्यात महागडी लीग बनली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी