मुंबई: आयपीएल(ipl) २०२३ ते आयपीएल २०२७ पर्यंत मंगळवारी अखेर बीसीसीआयने(bcci) स्पर्धेचे मीडिया अधिकार(media rights) विकले. मात्र यावेळच्या कमाईच्या आकड्यांने साऱ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. बीसीसीआयने हे मीडिया अधिकार तबल्ल ४८,३९० कोटी रूपयांना विकले आहेत. यातून होणाऱ्या कमाईचे विविध पैलू आणि आकडेवारी समोर आल्यानंतर सारेच हैराण झालेत.
अधिक वाचा - बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा
इंडियन प्रीमियर लीगच्या मीडिया राईट्सना भारी भक्कम रकमेने विकण्यात आले. यातून बीसीसीआयप्रत्येक फेकलेल्या बॉलमधून साधारण ४९ लाख रूपये कमावणार आहे. तसेच प्रत्येक ओव्हरमधून २.९५ कोटींची कमाई होईल. २०२३ पासून प्रत्येक आयपीएल सामन्यांतून बीसीसीआय ११८ कोटी रूपये कमावेल.
२०१८मध्ये स्टार इंडियाकडून मिळवल्यात आलेल्या पाच वर्षांच्या डीलनुसार भारतातच्या प्रत्येक घरगुती खेळाचे सरासरी मूल्य ६० कोटी रूपये आहे. विशेषरूपाने बीसीसीआय २०१८-२२ या मागील चक्रातप्रत्येक आयपीएल सामन्यातून साधारण ५५ कोटी रूपये कमावत होता. तीन दिवसांसाठी बीसीसीआयद्वारे आयोजित करण्यात आलेल्या इ लिलावात डिस्ने स्टारने टीव्ही मीडियाचे अधिकार कायम ठेवले तर वायकॉम १८ने २०२३-२७ पर्यंत आयपीएलच्या डिजीटल राईट्स विकत घेतले.
टीव्हीचे अधिकार मिळवण्यासाठी जास्तीत जास्त बोली २३,५७५ कोटी रूपये लावण्यात आली होती. तर वायकॉम १८नेडिजीटल अधिकारांसाठी पॅकेज बी आणि सीचा दावा करण्यासाठी २३,७५८ रूपये खर्च केले. वायकॉम १८ला पॅकेज डीमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युके या क्षेत्रातील अधिकार मिळाले आहेत तर टाईम्स इंटरनेटला मेना आणि यूएससे राईट्स मिळाले आहेत.
विशेष रूपाने पहिल्यांदा बीसीसीआयने आयपीएलच्या टीव्ही आणि डिजीटल अधिकारांचे विभाजन केले. येथे बोलीदातांना चार पॅकेज सादर करण्यात आले. (ए) भारत उप-महाद्वीप टेलीविजन, (बी) भारत उप-महाद्वीप डिजिटल, (सी) भारत डिजिटल गैर-अनन्य विशेष पॅकेज आणि पॅकेज डीमध्ये भारताशिवाय इतर देशांचा समावेश आहे.
अधिक वाचा - दानवे यांनी सत्तारांना दिली 'औरंगाबादच्या औरंगजेबाची' उपमा
लिलाव १२ जूनला ११ वाजता पॅकेज ए आणि बीसाठी सुरू झाला. टीव्ही अधिकारांसाठी ४९ कोटी रूपये आणि डिजीटल अधिकारांसाठी ३३ कोटी रूपये आधारभूत किंमतीपासून सुरू झाली आहे. आणि पक्षांकडे बोली लावण्यास ३० मिनिटांचा वेळ होता.