IPL Retention: मोठा खुलासा, SRHने रशीद खानला का केले नाही रिटेन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 02, 2021 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

SRH on Rashid Khan: आयपीएल रिटेन्शन प्रक्रियेत धक्कादायक बाब म्हणजे दिग्गज रशीद खानला सनरायजर्स हैदराबाद संघाने रिटेन केले. 

rashid khan
मोठा खुलासा, SRHने रशीद खानला का केले नाही रिटेन 
थोडं पण कामाचं
  • रशीद खानला हैदराबादने रिटेन केले नाही
  • आता टीमच्या सीईओने केला खुलासा
  • आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये रशीद खानची धूम

IPL Retention, SRH, rashid khan: आयपीएलच्या रिटेंशनच्या प्रक्रियेत धक्कादायक घडलेली बाब म्हणजे दिग्गज रशीद खानला सनरायजर्स हैदराबाद संघाने रिटेन केले नाही. रशीदला टीमने रिटेन न केल्याने चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. असाही रिपोर्ट समोर आला की रशीद आणि हैदराबाद संघ मॅनेजमेंट यांच्यात पैशावरून काहीतरी घडले. या कारणामुळे दिग्गज स्पिनरने लिलावामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता SRHचे सीईओे के शम्मी यांनी रशीद खानबाबत विधान केले आहे. 

सीईओ के शम्मी म्हणाले, रशीदला स्वत: मेगालिलावात जायचे होते. हा त्याचा निर्णय होता. सीईओने आपल्या विधानात पुढे म्हटले की मेगा लिलावात आम्ही पुन्हा एकदा रशीदला आपल्या संघात सामील करण्यासाठी बोली लावू. हा खूपच त्रासदायक निर्णय होता. रशीदला असे संघातून रिलीज होणे हे खरंतर दु:खदायक आहे. जर एखाद्या खेळाडूला स्वत:हून लिलावात जायचे असेल तर यावर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही त्याच्या या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावू. पाहू पुन्हा काय होते ते...

२०१७मध्ये हैदराबादने पहिल्यांदा रशीदला संघात सामील केले होते. २०१७मध्ये हैदराबादने त्याला ४ कोटी रूपयांना संघात सामील केले होते. त्यानंतर त्याच्या शानदार कामगिरीमुळे पगारात वाढ झाली. २०१८मध्ये त्याला ९ कोटी रूपये देण्यात आले होते. 

२०१८च्या लिलावात पंजाबने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली होती. मात्र अखेरीस हैदराबादने (RTM)चा वापर करत त्याला ९ कोटी देत पुन्हा संघात सामील केले होते. रशीदने हैदराबादसाठी ७६ सामने खेळले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट चांगला राहिला आहे. रशीदने ६.३३च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. आयपीएल रिटेंशननंतरर रशीदने ट्वीट करत आपली फ्रेंचायझी हैदराबादचे आभार मानलेहोते. 

सनरायझर्स हैदराबादने ३ खेळाडूंना केले रिटेन 

सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी संघासोबत कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. नंबर 1 खेळाडू - केन विल्यमसनला 14 कोटींना विकत घेतले.
नंबर 2 खेळाडू - अब्दुल समद - 4 कोटी रु.
नंबर-3 खेळाडू - उमरान मलिक - 4 कोटी रु.
पुढील मोसमात संघ दमदार शैलीत पुनरागमन करेल, असा विश्वास टॉम मूडीने व्यक्त केला. त्याचवेळी मुथय्या मुरलीधरन म्हणाला की, आम्ही या तिन्ही खेळाडूंना भविष्य डोळ्यासमोर ठेवून कायम ठेवले आहे. केन विल्यमसन व्यतिरिक्त आम्ही दोन तरुणांना संधी दिली आहे, ज्यांच्याकडे खूप प्रतिभा आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी