IPL Star व्यंकटेश अय्यरने ठोकलं तूफानी शतक, त्यानंतर रजनी स्टाईलमध्ये जल्लोष

Venkatesh Iyer a century dedicated to Rajinikanth सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. अय्यरने शतक झळकावल्यानंतर आपल्या आवडत्या सुपरस्टारला अर्पण करत त्याच्या स्टाईलमध्ये आपले आनंद साजरा केला.

 IPL star Venkatesh Iyer scores a stormy century, then shines in Rajni style
IPL Star व्यंकटेश अय्यरने झळकावले तूफानी शतक, त्यानंतर Rajni स्टाईलमध्ये जल्लोष ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विजय हजारे ट्रॉफी 2021-22 मध्ये व्यंकटेश अय्यरचे शतक
  • अय्यरने 3 सामन्यात 2 शतके झळकावली
  • अय्यरने शतकाचा आनंद सुपरस्टार रजनीकांतच्या शैलीत साजरे केले.

Venkatesh Iyer a century dedicated to Rajinikanth मुंबई : व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ (IPL 2021)मध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवून चाहत्यांची मने जिंकली. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियातही आपले स्थान निर्माण केले. अय्यरला (Venkatesh Iyer) न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या टी-20 मालिकेतही संधी मिळाली. सध्या भारतात देशांतर्गत सुरु असलेल्या  विजय हजारे ट्रॉफी (2021-22  Vijay Hazare Trophy) स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने 3 सामन्यात 2 शतके झळकावण्यात यश मिळवले आहे. 12 डिसेंबर रविवारी देखील, व्यंकटेशने आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले. झंझावती शतक करुन सुपरस्टार रजनीच्या स्टाईलमध्ये (Superstar Rajini's style) सेलिब्रिशन केले. (IPL star Venkatesh Iyer scores a stormy century, then shines in Rajni style)

151 धावांची स्फोटक खेळी

गेल्या हंगामातील आयपीएलमध्ये अय्यरने 10 सामन्यांमध्ये 370 धावा केल्या होत्या आणि 3 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याचा आयपीएल फॉर्म आता विजय हजारे ट्रॉफी 2021-22 मध्ये देखील दिसत आहे. भारतीय देशांतर्गत स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने 3 सामन्यात 2 शतके झळकावण्यात यश मिळवले आहे. 12 डिसेंबर रविवारी देखील, व्यंकटेशने आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आणि चंदीगड विरुद्ध 113 चेंडूत 151 धावांची स्फोटक खेळी खेळली, त्याच्या खेळीत अय्यरने 8 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याने 88 चेंडूत शतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली.

बीसीसीआयकडून त्याचा व्हिडिओ शेअर

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा १२ डिसेंबर वाढदिवस (Rajinikanth's birthday) आहे. त्यामुळे शतक झळकावल्यानंतर व्यंकटेशने आपल्या आवडत्या सुपरस्टारला हे शतक अर्पण करत आपल्या त्याच्या स्टाईलमध्ये आनंद साजरा केला. बीसीसीआयनेही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अय्यर शतक झळकावल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहे आणि रजनीकांतच्या सनग्लासेस घालण्याच्या शैलीची नक्कल करतो. व्हिडिओलाही खूप पसंती दिली जात आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात अय्यरच्या १५१ धावांच्या जोरावर मध्य प्रदेशने २० षटकांत ९ गडी गमावून ३३१ धावा केल्या होत्या. अय्यरशिवाय कर्णधार आदित्य श्रीवास्तवने 80 चेंडूत 70 धावांची खेळी केली.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत संधी मिळण्याची शक्यता 

व्यंकटेश अय्यर पहिल्या आयपीएलमध्ये आणि आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये ज्या प्रकारची कामगिरी करत आहे ते लक्षात घेऊन बीसीसीआय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड करू शकते. काही दिवसांनी बीसीसीआय वनडे मालिकेसाठी संघ निवडणार आहे. एकीकडे हार्दिक पांड्याचा फिटनेस सातत्याने ढासळत चालला आहे, तर दुसरीकडे व्यंकटेश अय्यरची देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून केलेली उत्कृष्ट कामगिरी भारताला हार्दिकचा उत्तराधिकारी मिळाल्याचे स्पष्ट करत आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी