IND vs NZ: अजिंक्य रहाणेचा टीम इंडियातून पत्ता कट? 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 30, 2021 | 14:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NZ: अजिंक्य रहाणे कानपूर कसोटीत पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यानंतर त्यांच्या स्थानावर सवाल केले जात आहेत. 

ajinkya rahane
IND vs NZ: अजिंक्य रहाणेचा टीम इंडियातून पत्ता कट?  
थोडं पण कामाचं
  • भारत वि न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णीत
  • अजिंक्य रहाणे मोठी खेळी करण्यात अपयशी
  • रहाणेने पहिल्या कसोटीत केल्या अनुक्रमे 

मुंबई: कानपूर कसोटीत(kanpur test match) अखेरच्या दिवशी न्यूझीलंडचे(new zealand) ९ विकेट पडल्यानंतरही टीम इंडिया विजय मिळवू शकली नाही. टीम इंडिया(team india) शेवटच्या ५२ बॉलमध्ये एकही विकेट घेऊ शकली नाही आणि न्यूझीलंडने पहिली कसोटी अनिर्णीत(test draw) राखली. या कसोटीत विराट कोहलीच्या(virat kohli) अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे(ajinkya rahane) पु्न्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दरम्यान, कोच राहुल द्रविड(coach rahul dravid) रहाणेच्या खराब फॉर्ममुळे चिंतेत आहेत. त्यांनी रहाणेचा बचाव करताना म्हटले की तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल. Is ajinkya rahane will dropped out from team india for second test against new zealand?

कानपूर टेस्टमध्ये फ्लॉप झाल्यानंतर हा सवाल केला जात आहे की विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला मुंबईच्या कसोटीसाठी संघात जागा मिळणार का? द्रविडने याचे सरळ उत्तर तर दिले नाही मात्र इशाऱ्यांमध्ये अनेक गोष्टी केल्या. खरंतर, सामना संपल्यानंत व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा द्रविडला विचारण्यात आले की रहाणेचा सध्याचा फॉर्म संघाची चिंता वाढवणारा आहे. त्यावर द्रविड म्हणाला, यासाठी जास्त चिंता करण्याची गरज नाही. जाहीरपणे तुम्हालाही वाटत असेल की अजिंक्यने जास्त धावा बनवाव्यात. त्याला स्वत:लाही हेच हवे असणार. 

रहाणे फॉर्म परत मिळवण्यापासून एक सामना दूर - द्रविड

भारताचे मुख्य कोच राहुल द्रविडने पुढे म्हटले, रहाणे एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने गेल्या अनेक वर्षात भारतासाठी कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. तो त्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्याकडे टॅलेंट आणि अनुभव दोन्ही आहे. ही केवळ एका सामन्याची गोष्ट आहे. त्यालाही हे माहीत आहे आणि आम्हीही हे समजतो. 

द्रविडने प्लेईंग ११ बाबत पत्ते नाही खोलले

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली परतणार आहे. अशातच रहाणेला प्लेईंग ११मध्ये जागा देण्यासाठी कानपूर टेस्टचा हिरो श्रेयस अय्यरला बेंचवर बसवले जाणार का? यावर द्रविड म्हणाला, सध्या आम्ही हे ठरवले नाही आहे की आमच्या प्लेईंग ११मध्ये कोण असणार आहे. आमचे लक्ष कानपूर टेस्टवर आहे. जेव्हा आम्ही मुंबईत जाऊ तेव्हा तिथली स्थिती पाहू आणि सध्याच्या उपलब्ध खेळाडूंच्या फिटनेसची माहिती मिळवल्यांनंतरच याबाबतचा निर्णय घेऊ. कोहलीही संघात परतणार आहे. त्याच्याशीही बोलावे लागेल. यानंतरच निर्णय घ्यावा लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी