T-20 world cup: भारताला घाबरला बांगलादेश? स्कॉटलंडविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाले सवाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 19, 2021 | 14:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

बांगलादेशला स्कॉटलंडकडून ६ धावांनी धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. यानंतर असे सवाल उठत आहेत.

t-20 world cup
T-20 world cup: भारताला घाबरला बांगलादेश? 
थोडं पण कामाचं
  • बांगलादेशच्या पराभवाने काय होणार?
  • उलटाही पडू शकतो खेळ
  • याआधीही असे झालेत आरोप

मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. क्वालिफायर ग्रुप बीमधील सामन्यात बांगलादेशला स्कॉटलंडकडून ६ धावांनी धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. यानंतर असे सवाल उठत आहेत की बांगलादेश हा सामना मुद्दाम हरला का? भारताला घाबरल्याने बांगलादेश हा सामना हरला का? असे सवाल यामुळे उपस्थित केले जात आहेत याचे कारण आम्ी तुम्हाला सांगतो.

बांगलादेशच्या पराभवाने काय होणार?

बांगलादेश क्वालिफायिंग राऊंडच्या ग्रुप बीमध्ये आहे. यात नंबर वन असणारी टीम सुपर १२च्या ग्रुप २मध्ये जाईल. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. वर्ल्डकपमध्ये सुपर १२च्या व्यतिरिक्त सेमीफायनल आणि फायनलचे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. यूएईच्या पिचवर आशियाई संघासमोर बांगलादेशचे आव्हान कमकुवत ठरू शकते. अशा स्थितीत येऊ नये यासाठी बांगलादेशला क्वालिफायिंग राऊंडमध्ये टॉपमध्ये येण्यापासून वाचावे लागेल. स्कॉटलंडविरुद्धच्या पराभवानंतर ही शक्यता अधिक दाट आहे. 

उलटाही पडू शकतो खेळ

दरम्यान, असे म्हणणेही योग्य ठरणार नाही की बांगलादेश मुद्दाम हरला आहे. मात्र त्यांनी हे जर भारत अथवा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांतून बचावासाठी हे केलं असेल तर त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो. क्वालिफायिंग राऊंडमध्ये बांगलादेश ग्रुपमध्ये ओमानही आहे. ओमानने आपला पहिला सामन्यात पापुआ न्यू गिनीला १० विकेटनी हरवले. ओमनच्या संघाने जर बांगलादेशला हरवले तर बांगलादेशला सुपर १२ फेरीत जाणे कठीण होईल. 

याआधीही असे झालेत आरोप

१९९२च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या संघावर असेच आरोप करण्यात आले होते. त्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या सात लीग मॅच सलग जिंकल्या हो्त्या, शेवटच्या ीलीग सामन्यात त्यांच्यासमोर पाकिस्तान होता. जर किवीचा संघ हा सामना जिंकतात त ते सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार होते.पराभवाच्या स्थितीत न्यूझीलंडला आपल्या रात पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल खेळावी लागली असती. न्यूझीलंड अखेरच्या लीग सामन्यात पाकिस्तानकडून हरला. दरम्यान, पाकिस्तानने सेमीफायनलमध्य त्यांना पुन्हा हरवले आणि अखेर वर्ल्डकपवर नाव कोरले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी