Asia Cup:या खेळाडूंसाठी बंद झाले Playing 11चे दरवाजे! आशिया कपमध्ये बेंचवर बसणार...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 10, 2022 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asia Cup: आशिया कपसाठी टीम इंडिया अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या खेळाडूंना टीम इंडियामध्ये जागा मिळाली आहे मात्र प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा बनवणे कठीण दिसत आहे. 

team india
Asia Cup:या खेळाडूंसाठी बंद झाले Playing 11चे दरवाजे!  
थोडं पण कामाचं
  • रवी बिश्नोईने भारतीय संघासाठी आपले पदार्पण रोहित शर्माच्या नेतृत्वात केले होते.
  • बिश्नोईने वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन टी-२० सामने खेळले आहेत.
  • आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये रवी बिश्नोईसाठी रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहलसारखे घातक गोलंदाज सामील आहेत.

मुंबई: निवड समितीने(selection committee) आशिया कपसाठी(asia cup) भारतीय संघाची(indian team) घोषणा केली आहे. टीम इंडियामध्ये विराट कोहली(virat kohli) आणि के एल राहुलसारख्या(KL rahul) दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया कप जिंकला आहे. भारतीय संघात तीन असे खेळाडू आहेत ज्यांना आशिया कपसाठी भले जागा मिळाली असेल मात्र प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा बनवणे कठीण दिसत आहे. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...Is door closed for this player of team india?

अधिक वाचा - तरुण कलाकारांना हृदयविकाराचा झटका का येतो? काय आहेत कारणे

प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होऊ शकतो हा खेळाडू

रवी बिश्नोईने भारतीय संघासाठी आपले पदार्पण रोहित शर्माच्या नेतृत्वात केले होते. बिश्नोईने वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन टी-२० सामने खेळले आहहेत. आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये रवी बिश्नोईसाठी रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहलसारखे घातक गोलंदाज सामील आहेत. अश्विन आणि चहलकडे भरपूर अनुभव आहे. अशातच कर्णधार रोहित शर्मा अनुभवी गोलंदाजांना प्लेईंग ११मध्ये सामील करण्यास पसंती देईल. अश्विन आणि चहलने टीम इंडियाला आपल्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत. 

विराट कोहलीचे दीर्घकाळानंतर पुनरागमन

सुपरस्टार फलंदाज विराट कोहील दीर्घकाळापासून टीम इंडियात परतत आहे. कोहली खूपच खराब फॉर्मात आहे.. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाही आहेत. विराट कोहलीचे प्लेईंग ११मध्ये खेळणे अतिशय ठरलेले आहे अशातच दीपक हुड्डाला बाहेर बसवले जाऊ शकते. कोहली मोठ्या सामन्यांतील खेळाडू आहे आणि टीम इंडियाची बॅटिग ऑर्डर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. 

अधिक वाचा - शिंदे गटातील या आमदारांना मंत्रिपद देण्यास भाजपचा होता विरोध

आशिया कप 2022 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.

असे आहे वेळापत्रक

२७ ऑगस्ट शनिवार  श्रीलंका वि अफगाणिस्तान 
२८ ऑगस्ट रविवार   भारत वि पाकिस्तान
३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश वि अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट बुधवार   भारत वि क्वालिफायर
१ सप्टेंबर    गुरूवार  श्रीलंका वि बांगलादेश
२ सप्टेंबर   शुक्रवार  पाकिस्तान वि क्वालिफायर
३ सप्टेंबर   शनिवार   बी १ वि बी २                   सुपर ४
४ सप्टेंबर   रविवार    ए १ वि ए २                     सुपर ४
६ सप्टेंबर   मंगळवार  ए १ वि बी १                   सुपर ४
७ सप्टेंबर   बुधवार     ए २ वि बी २                   सुपर ४
८ सप्टेंबर   गुरूवार    ए १ वि बी २                   सुपर ४
९ सप्टेंबर   शुक्रवार    बी १ वि ए २                   सुपर ४
११ सप्टेंबर  रविवार     फायनल सामना

सर्व सामने संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी