ODI World Cup:२०२३च्या वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 08, 2022 | 15:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

२०२३ वनडे वर्ल्डकपचे यजमानपद भाराताकडे आहे त्यामुळे या स्पर्धेत भारत खेळणार हे नक्की आहे. मात्र पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका सारख्या संघांना वर्ल्डकपमध्ये जागा मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. 

pakistani
ODI World Cup:२०२३च्या वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर? 
थोडं पण कामाचं
  • आयसीसीच्या वनडे वर्ल्डकप सुपर लीगमध्ये एकूण  १३ संघ सामील आहेत.
  • सध्याच्या काळात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सुरूवातीच्या सात संघांमध्ये सामील नाही
  • जर येणाऱ्या सामन्यांमध्ये हे संघ चांगली कामगिरी करत नाहीत तर त्यांना असोसिएट देशांसोबत क्वालिफाईंग राऊंड खेळावा लागू शकतो.

मुंबई: भारतात होणाऱ्या २०२३ वनडे वर्ल्डकपसाठी(one day world cup 2023) पाकिस्तान(pakistan) स्पर्धेबाहेर जेाऊ शकतो. पाकिस्तानशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेवरही या स्पर्धेतून बाहेर जाण्याचा धोका सतावत आहे. आयसीसी्च्या नियमानुसार क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगच्या(super league) सुरूवातीच्या सात स्थानांवर राहाणार संघ आणि स्पर्धेचे यजमानपद भूषवणारा संघ सरळ या वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करतील. is pakistan out of icc one day world cup 2023?

अधिक वाचा - पब्जी खेळायला नकार दिला म्हणून आईवर झाडल्या गोळ्या

तर उरलेले पाच संघ असोसिएट देशांसोबत क्वालिफाईंग राऊंड खेळतील आणि सुरूवातीचे दोन संघ वर्ल्डकपमध्ये जागा बनवतील. आयसीसीच्या वनडे वर्ल्डकप सुपर लीगमध्ये एकूण  १३ संघ सामील आहेत. आयसीसीच्या १२ कसोटी खेळणाऱ्या देशांव्यतिरिक्त नेदरलँड्सचा संघ हा याचा भाग आहे. नेदरलँडने क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ जिंकून या लीगमध्ये आपले स्थान बनवले आहे. आता १३ संघांपैकी भारत आणि सुपर लीगच्या सुरूवातीचे सात संघ सरळ वर्ल्डकपमध्ये जागा बनवणार आहेत. त्यामुळे बाकी संघांना बरीत मेहनत करावी लागेल.

या संघांसाठी समस्या

सध्याच्या काळात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सुरूवातीच्या सात संघांमध्ये सामील नाही. जर येणाऱ्या सामन्यांमध्ये हे संघ चांगली कामगिरी करत नाहीत तर त्यांना असोसिएट देशांसोबत क्वालिफाईंग राऊंड खेळावा लागू शकतो. यातील दोन अव्वल संघ वर्ल्डकपमध्ये जागा मिळवतील. 

अधिक वाचा - IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती

काय आहे सुपर लीगची स्थिती

सुपर लीगमध्ये बांगलादेशचा संघ पहिल्या स्थानावर तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या आणि वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर भारत तर सहाव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. हे सर्व संघ वर्ल्डकपमध्ये क्वालिफायसाठी पात्र आहेत. नवव्या स्थानावर न्यूझीलंड तर दहाव्या स्थानावर पाकिस्तान आहे. ११व्या नंबरवर दक्षिण आफ्रिका आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी