विराट कोहली प्रकरणात गांगुली आणि द्रविडचाही हात?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 16, 2021 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

sourav ganguly and virat kohli: विराट कोहलीची कॉन्फरन्स बुधवारी पार पडली. यात विराट कोहलीने स्पष्ट केले की त्याचा रोहितशी कोणत्याही प्रकारचा वाद नाही. तसेच त्याला वनडेचे नेतृत्व करायचे होते मात्र बीसीसीआयने त्याला संधी दिली नाही.

rohit sharma
विराट कोहली प्रकरणात गांगुली आणि द्रविडचाही हात? 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिका दौऱ्याआधी वादात टीम इंडिया
  • विराट कोहली वनडे खेळणार

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी दोन नावे आहेत ज्यांच्यावर संपूर्ण देशाला गर्व आहे. या दोन्ही खेळाडूंनी देशासाठी आपल्या खेळाने खूप योगदान दिले आहे. जेव्हाही टीम संकटात असते तेव्हा हे खेळाडू जबरदस्त कामगिरी करून संघाला विजयाची वाट मिळवून देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून नीट काही सुरू नाही आहे. विराट कोहलीवर मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी करण्याचा दबाव आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाची जादू ही काही प्रमाणात समस्या होत आहे. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडे मागे जावे लागेल २०१९ममध्ये, भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्याच्या केवळ दोन पावले दूर होता. मात्र ते स्वप्न अधुरे राहिले. न्यूझीलंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये भारताला हरवले. Is sourab ganguly and rahul dravid hands in virat kohli case?

नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

विराट कोहलीच्या नेतृत्वावर सवाल करण्यात आले. मात्र लपून लपून. यानंतर टी-२०ची वेळ येते. वर्ष २०२१. भारत आणि पाकिस्तान आमने सामने. संपूर्ण भारत निश्चिंत होता की भारतच नेहमीप्रमाणे जिंकणार. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जे झाले ते इतक्या वर्षांमध्ये कधी घडले होते. पाकिस्तानने खूपच वाईट पद्धतीने भारताला हरवले. पाकिस्तानने पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये भारताला हरवले. यानंतर विराट कोहलीवर एक कर्णधार म्हणून जोरदार टीका करण्यात आली. 

रोहितने मुंबईला शिखरावर नेले

दुसरीकडे रोहितने आपल्या नेतृत्वाचे जलवे आयपीएलमध्ये दाखवले आहेत. मुंबईला त्याने शिखरावर नेले. जेव्हा जेव्हा त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने आपल्या कामगिरीने सगळ्यांना खुश केले. आयपीएल २०२१ सुरू होण्यासाठी विराटने सांगितले होते की एक कर्णधार म्हणून त्याची शेवटची आयपीएल असेल. त्यानंतर त्याने टी-२० कर्णधारपदही सोडले होते. अपेक्षेनुसार रोहितला टी-२०चा कर्णधार बनवण्यात आले. मात्र त्यानंर विराट वनडे आणि कसोटीचे नेतृत्व करत राहील असे वाटले होते. मात्र विराटकडून वनडेचे नेतृत्व काढून घेण्यात आले. बीसीसीआयने विराटला जोरदार धक्का दिला. 

राहुल द्रविडचाही यात हात?

असं मानलंकी शॉर्ट फॉरमॅटमध्ये एक कर्णधार असायला हवा. मात्र एका मालिकेसाठी थांबता आले असते. विराटला वेळ दिला गेला असता. तो स्वत:च या कर्णधारपदावरून हटला असता. जसे त्याने आयपीएल आणि टी-२०साठी केले. आता सवाल असा आहे की राहुल द्रविडचाही यात हात आहे का? कारण राहुल द्रविड सध्या नवीन कोच आहोत आणि पुढील विचार करून आपल्या प्लानिंगवर काम करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी