CSK सोबतचा रैनाचा प्रवास संपला?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 31, 2020 | 16:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

suresh raina journey with csk: सुरेश रैनाचा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंगसोबतचा प्रवास संपल्याचे म्हटले जात आहे.

suresh raina and ms dhoni
CSK सोबतचा रैनाचा प्रवास संपला? 

थोडं पण कामाचं

  • रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही
  • वैयक्तिक कारणामुळे रैनाने आयपीएलमधून घेतली माघार
  • काही दिवसांपूर्वीच सुरेश रैनाने निवृत्ती जाहीर केली होती

मुंबई: सुरेश रैनाबाबत(suresh raina) सांगितले जात आहे की खासगी कारणांमुळे त्याने इंडियन प्रीमियर लीग(Indian Premier League)मधून माघार घेतली. मात्र चेन्नई सुपर किंगसोबतचा(chennai super kings) त्याचा प्रवास संपल्याचे दिसत आहे कारण ही फ्रेंचायजी २०२१च्या सत्राच्या आधी त्याच्यासोबतचे संबंध तोडू शकते. चेन्नईची टीम(chennai team) सध्या दुबईत आहे. दोन खेळाडूंसह त्यांचे १२ मेबर्स कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) आढळले आहेत. 

आयपीएल सूत्रांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(international cricket) निवृत्ती(retirement) घेणाऱ्या रैनाच्या निर्णयामध्ये स्टाफ पॉझिटिव्ह असल्याने महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र हेही समजले आहे की संघ व्यवस्थापकही क्वारंटाईनदरम्यान रैनाच्या वर्तणुकीने खुश नव्हते. इतकंच नव्हे तर संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एनन श्रीनिवासनही रैनापासून नाराज होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसकेच्या नियमांनुसार कर्णधार, प्रशिक्षक आणि मॅनेजरला हॉटेलमध्ये राहण्यासाठी सूट्स मिळतात. मात्र टीम ज्या हॉटेलमध्ये राहते तेथे रैनालाही सूट मिळते. दरम्यान, त्यांच्या रुमला बाल्कनी नव्हती इतकीच गोष्ट होती. ते पुढे म्हणाले, हा मुद्दा होता मात्र मला नाही वाटत की भारतात येण्यामागे हे मोठे कारण होते. संघात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यापेक्षा मोठा मुद्दा असू शकत नाही. स्थिती पाहता रैना एप्रिल २०२१ पासून सुरू होणाऱ्या आयपीएलमधूनही चेन्नई टीममधून बाहेर होण्याची शक्यता आहे. 

रैनाची जागा घेणार हा क्रिकेटर

रैना या सत्रात पुनरागमन करणार का ज्यामुळे परिस्थिती बदलेल यावर सूत्रांनी म्हटले, तो या सत्रात उपलब्ध नसेल आणि सीएसकेने अधिकृत विधान करताना यात स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ज्या क्रिकेटरने निवृत्ती घेतली आहे आणि कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार नाही हा क्रिकेटर सीएसकेमध्ये पुनरागमन करेल याची शक्यता कमी आहे. तो पुन्हा लिलावात सामील होईल आणि एखादी टीम त्याला घेऊ शकते. सीएसकेने ऋतुराजवर मोठी बोली लावली होती. त्यांना विश्वास आहे की क्वारंटाईन संपल्यानंतर तो फिट असेल आणि दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो सराव सत्रात खेळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी