T20 WC: या मुलींमुळे टीम इंडिया सामना हरली? ट्विटरवर गोंधळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2021 | 15:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पराभवानंर अनेक सोशल मीडिया पेजवर हे फोटो व्हायरल होत आहे. यात चाहते भारताच्या पराभवासाठी यांना जबाबदार ठरवत आहेत.

models
T20 WC: य़ा मुलींमुळे टीम इंडिया सामना हरली? ट्विटरवर गोंधळ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर व्हायरल होतायत जुने फोटो
  • केंडल जेनर, जीजी हदीद आहेत पॉप्युलर मॉडेल

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup) टीम इंडियाने(team india) सलग दोन सामने गमावले. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) पराभवानंतर टीम इंडिया चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. चाहते या पराभवासाठी अजबगजब तर्क लढवत आहेत. अशातच काही मुलींचे फोटो सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. ज्यात न्यूझीलंडच्या सपोर्टमध्ये उभ्या असलेल्या काही मुलींचे फोटो शेअर करण्यात आले. मात्र सत्य काही वेगळेच आहे. Is team india defeat because of this girls?

खरंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत त्यात मॉडेल  केंडल जेनर, जीजी हदीद यांचा समावेश आहे. दोघांनी ब्लॅक ड्रेस घातला आहे. हा ड्रेस न्यूझीलंडच्या जर्सीशी मिळताजुळता आहे. अनेक ट्विटर अकाऊंट आणि सोशल मीडिया पेजवर म्हटले जात आहे की भारताच्या पराभवासाठी या जबाबदार आहेत. दरम्यान, ही एक ट्रोलिंगची पद्धत आहे. 

अनेक वर्षे जुना फोटो व्हायरल

केंडल जेनर, जीजी हदीदचा हा फोटो खूप जुना आहे. याचे भारत-न्यूझीलंड सामन्याशी काही  देणेघेणे नाही. हा फोटो २०१५ या सालातील आहे. दोघीही स्टार्स एक फ्रेंच फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आले होते. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असेच काहीसे भारत-न्यूझीलंडच्या सामन्यादरम्यान झाले. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला याचे कारण खराब कामगिरी. अशातच सोशल मीडियावर चाहते अनेक प्रकारचे बहाणे शोधत आहे. 

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंतच्या दोनही सामन्यात पराभव पत्करला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला १० विकेटनी हरवले होते कर न्यूझीलंडने ९ विकेटनी मात दिली. भारताला आता अफगाणिस्तान, नामिबिया, स्कॉटलंड यांच्याविरुद्ध सामने खेळायचे आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी