टीम इंडियाचा स्टार खेळाडू डेंजर झोनमध्ये ? कधीही दाखवला जाऊ शकतो संघातून बाहेरचा रस्ता

Ishant Sharma place in Team India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. आगामी काळात अनुभवी गोलंदाजाची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.

 Is the career of this star player of Team India in danger? The way out of the team can be shown at any time
टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू डेंजर झोनमध्ये ? कधीही दाखवला जाऊ शकतो संघातून बाहेरचा रस्ता ।  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सध्या अनेक दिग्गज खेळाडू टीम इंडियामध्ये सामील झाले आहेत
  • टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे,
  • आगामी काळात अनुभवी गोलंदाजाची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.

Ishant Sharma career  in denger । नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. सध्या अनेक दिग्गज खेळाडू टीम इंडियामध्ये सामील झाले आहेत. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे, त्यामुळे आगामी काळात अनुभवी गोलंदाजाची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.

टीम इंडियाच्या या स्टारचे करिअर धोक्यात?

वरिष्ठ वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 2007 साली बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढच्याच महिन्यात इशांतला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. इशांतने आतापर्यंत 80 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 115 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला असला तरी शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये तितका या  यशस्वी ठरला नाही. आगामी मालिकांसाठी तरुणांबाबत लवकरच मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, त्यासाठी टीम इंडियामध्ये तयारी सुरू झाली आहे.

इशांत शर्माचे पत्ता कट होऊ शकतो​

इशांतची एकदिवसीय कारकीर्द चांगली आहे असे म्हणता येईल, परंतु निवडकर्त्यांनी त्याला 2016 पासून एकही वनडे खेळण्याची संधी दिलेली नाही. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. सिराजसारखे गोलंदाज कसोटीच्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत टीम इंडियातून इशांत शर्माचे पत्ता कट होऊ शकतो. इशांतने 100 हून अधिक कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने 311 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियात नवीन खेळाडूंना संधी

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर, भारत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत किवी संघाचाही क्लीन स्वीप करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणे कर्णधार असेल. श्रेयस अय्यर, केएस भरत आणि कृष्णा या युवा खेळाडूंना 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक

२ सामन्यांची कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना - 25-29 नोव्हेंबर 2021 - कानपूर - सकाळी 9:30

दुसरा कसोटी सामना - 3-7 डिसेंबर 2021 - मुंबई - सकाळी 9:30

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी