मुंबई: भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध(india vs west indies) पाच टी-२० सामन्यांच्या मालिका खेळत आहे. टीम इंडिया(team india) मालिकेत २-१ने पुढे आहे. चौथ्या टी-२० सामन्यात ६ ऑगस्टला अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल. टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र टीम इंडियाचा एक स्टार क्रिकेटरला वेस्ट इंडिज दौऱ्यात(west indies tour) केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्याला प्लेईंग ११मधून(playing 11) बाहेर करण्यात आले. (is there injustice with ravi bishoi in team)
अधिक वाचा - प्राध्यापक पतीचा वनरक्षक पत्नीने केली हत्या, असा झाला उलघडा
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात जादुई गोलंदाज रवी बिश्नोईला संधी मिळाली होती. बिश्नोईने पहिल्या सामन्यात कमाल केली. या सामन्यात रवी बिश्नोईने चार ओव्हरमध्ये २६ धावा देत २ विकेट मिळवल्या. मात्र शानदार कामगिरीच्या नंतरही बिश्नोईला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले. यामुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
रवी बिश्नोई आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तो मिडल ओव्हर्समध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो. याशिवाय तो परवडणारा गोलंदाज ठरते. जेव्हा कर्णधाराला विकेटची गरज असते तेव्हा रवी बिश्नोईचा नंबर डायल केला जातो. रवी बिश्नोई अवघ्या काही बॉलमध्येच सामन्याचे चित्र बदलण्यात माहीर आहे.
रवी बिश्नोई आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. याचा कर्णधार के एल राहुल आहे. आयपीएल २०२२मध्ये रवी बिश्नोईने शानदार खेळ केला होता. रवी बिश्नोईने आयपीएलच्या ३७ सामन्यांमध्ये ३७ विकेट आपल्या नावे केल्या. तो लखनऊ संघासाठी सगळ्यात मोठा मॅच विनर ठरला आहे.
अधिक वाचा - बारा वर्षांच्या सरफराजने सांगितली शाळेची धक्कादायक सत्यकथा
रवी बिश्नोईने रोहित शर्माच्या नेतृत्वात आपले पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघासाठी ७ टी-२० सामन्यात ९ विकेट मिळवल्या आहेत. त्याच्या जादुई गोलंदाजीने सारचच चकित झाले. त्याच्याकडे क्षमता आहे की तो कोणत्याही प्रकारचे गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त करेल.