काय हा आहे आतापर्यंतचा बेस्ट कॅच?  या मराठमोळ्या फिल्डरचे जगात होतंय कौतुक 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 12, 2019 | 18:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रिकेटचे चाहते हे मान्य करीत आहेत की त्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच पाहिला आहे. भारतीय क्रिकेटर ऋतूराज गायकवाड याच्या या प्रयत्नांचे कौतुक सर्व जगात होत आहे. 

world best catch ever
काय हा आहे आतापर्यंतचा बेस्ट कॅच?   

मुंबई :  महाराष्ट्राचा मराठमोळा फिल्डर ऋतूराज गायकवाड याने सैय्याद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग ग्रुप एच्या सामन्यात शानदार फिल्डिंग करून रेल्वेच्या मंजीत सिंह याला बाद केले. सिंहने विशाल गितेच्या चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न केला.  चेंडू बाउंड्रीच्या बाहेरही जात होता. पण लॉंग ऑफवर  सज्ज असलेल्या ऋतूराज गायकवाडने बाउंड्री लाइनवर उडी घेऊन एका हाता चेंडू झेलला आणि ब्राउंड्रीच्या बाहेर जाण्यापूर्वी डोळ्याची पापणी लवत नाही, इतक्या चपळाईने मागील दिशेने आपला साथीदार दिव्यांग हिमगणेकर याच्याकडे चेंडू फेकला. हिमगणेकर याने दोन ती पाऊले मागे जात हा सहज कॅच पकडला. हा सामन्याचा अखेरचा चेंडू होता. 

 

 

गायकवाडच्या या कॅचची फुटेज मार्च महिन्यातील आहे. पण आता हा कॅच सोशल मीडिायवर व्हायरल होत आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने या कॅचवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ब्रॉडने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले की कोणत्याही परिस्थितीत हा एक शानदार कॅच आहे. गायकवाडच्या या व्हिडिओची चर्चा आता जगात होत आहे. एका युजरने म्हटले आहे की हिमगणेकर यालाही या कॅचचे श्रेय दिले पाहिजे. गायकवाडने बाउंड्रीबाहेर पाय टेकविण्यापूर्वी हिमगणेकर याच्याकडे चेंडू फेकला. त्यामुळे त्याच्या क्रिकेटींग मेंदूचे कौतुक होत आहे. 

कॅच जरूर खूप इंटरेस्टिंग होता पण मॅच म्हणून त्याचे काही महत्त्व नव्हते. कारण रेल्वेने हा सामना कॅचपूर्वीच गमावला होता. त्यांना अखेरच्या चेंडूवर २२ धावांची गरज होती. महाराष्ट्राने हा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण फायनलमध्ये कर्नाटकने त्यांचा आठ विकेटने पराभव केला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...