India vs West Indies: वेस्ट इंडिज दौऱ्यावर Pantच्या जागी उतरणार हा २४ वर्षांचा खेळाडू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 19, 2022 | 14:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs West Indies:वेस्ट इंडिजविरुद्ध स्टार विकेटकीपर ऋषभ पंत खेळत नाहीये. अशातच त्याच्या जागी २४ वर्षी स्टार खेळाडूवर विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

rishabh pant
विंडिज दौऱ्यावर Pantच्या जागी उतरणार हा २४ वर्षांचा खेळाडू 
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऋषभ पंतच्या जागी इशान किशन उतरू शकतो.
  • इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघतायत.
  • इशान जेव्हा लयीत असतो तेव्हा कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला तोंड देऊ शकतो.

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी(west indies tour) स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला(rishabh pant) आराम देण्यात आलाय. पंत खूपच शानदार फॉर्मात आहे. त्याच्याकडे क्षमता आहे की तो काही बॉलमध्ये सामन्याचे चित्र बदलू शकतो. विंडीज दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व शिखर धवनच्या(shikhar dhawan) हाती आहे. अशातच एका स्टार प्लेयरला विकेटकीपिंगची जबाबदारी मिळू शकते. हा खेळाडू विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीर आहे. जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...ishan kishan may get chance in west indies tour 

अधिक वाचा - अमेरिकी तरुणीनं रचला स्वतःच्याच अपहरणाचा डाव

पंतच्या जागी उतरणार हा क्रिकेटर 

वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऋषभ पंतच्या जागी इशान किशन उतरू शकतो. इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघतायत. इशान जेव्हा लयीत असतो तेव्हा कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला तोंड देऊ शकतो. इशान किशनने भारतासाठी तीन वनडे सामने खेळलेत. यात त्याने ८८ धावा केल्यात.  सिलेक्टर्सनी त्याला तितक्या संधी दिल्या नाहीत जितक्या ऋषभ पंतला दिल्या. मात्र इशान किशनमध्ये खूप प्रतिभा आहे. 

शिखर धवनसोबत बनू शकतो ओपनिंग पार्टनर 

वेस्ट इंडिज मालिकेत कर्णधार रोहित शर्मा खेळत नाही आहे. अशातच इशान किशन स्टार शिखर धवनसोबत सलामीवीर म्हणून उतरू शकतो. इशान नेहमीच टीम इंडियासाठी धमाकेदार ओपनिंग करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो मोठ्या स्तरावरील खेळाडू आहे. इशान किशनने अंडर १९ वर्ल्डडकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. 

मिळणार विकेटकीपींगची जबाबदारी

इशान किशनमुळे ओपनिंग आणि विकेटकीपींगची समस्या सुटू शकते. तो भारताचा स्टार विकेटकीपर्सपैकी एक आहे. तो रोहित शर्माप्रमाणे बॉलला हिट करतो. त्याने मुंबई इंडियन्सकडून सलामीवीराची भूमिका साकारली आहे. तर टी-२० वर्ल्डकप २०२१मद्ये न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार विराट कोहलीने त्याला रोहित शर्माच्या जागी ओपनिंगसाठी संधी दिली होती. 

अधिक वाचा - मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर

मेगा लिलावात महागडा खेळाडू

आयपीएल मेगा लिलाव २०२२मध्ये इशान किशनवर १५ कोटी २५ लाखांची बोली लागली होती. त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील केले. इशानने मुंबई इंडियन्स संघासाठीही चांगली खेळी केली. अशातच वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी