India vs Bangladesh: डे-नाईट टेस्टमध्ये ईशांत शर्मानं रचला नवा इतिहास

Ishant Sharma first Indian to take 5 wickets in Day Night Test: टीम इंडियाचा सर्वात अनुभवी बॉलर ईशांत शर्मानं कोलकात्तामध्ये सुरू असलेला डे नाइट टेस्टदरम्यान आपलं नाव नेहमीसाठी रेकॉर्ड बुक्समध्ये दाखल केलं आहे.

Ishant Sharma
India vs Bangladesh: डे-नाईट टेस्टमध्ये ईशांत शर्मानं रचला नवा इतिहास  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • ईशांत शर्मानं शुक्रवारी बांगलादेशविरूद्ध ईडन गार्डन्समध्ये सुरू असलेल्या डे नाइट टेस्टमध्ये इतिहास रचला आहे.
  • ईशांतनं पिंक बॉलनं खेळताना डे-नाइट टेस्टच्या एका डावात पाच विकेट्स घेणारा पहिला भारतीय बॉलर ठरला आहे.
  • ईशांत शर्मानं सामन्यात 12 ओव्हरच्या बॉलिंगमध्ये 22 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या.

कोलकात्ताः टीम इंडियाचा सर्वात अनुभवी वेगवान बॉलर ईशांत शर्मानं शुक्रवारी बांगलादेशविरूद्ध ईडन गार्डन्समध्ये सुरू असलेल्या डे नाइट टेस्टमध्ये इतिहास रचला आहे. ईशांतनं पिंक बॉलनं खेळताना डे-नाइट टेस्टच्या एका डावात पाच विकेट्स घेणारा पहिला भारतीय बॉलर ठरला आहे. त्यानं भारतासाठी सामन्यात बॉलिंगची सुरूवात मेडन ओव्हरसोबत केली आणि पिंक बॉलनी भारतासाठी पहिली विकेट घेतली. त्यानंतर तो पाच विकेट घेणारा पहिला भारतीय बॉलर बनला. 

ईशांत शर्मानं सामन्यात 12 ओव्हरच्या बॉलिंगमध्ये 22 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या. यावेळी त्यानं चार ओव्हर मेडन टाकले. ईशांतनं इमरूल कायेस, महमूदुल्लाह, नईम हसन, इबादत हुसैन आणि मेहदी हसनला आपलं शिकार बनवलं. त्याच बॉलवर लिटन दास डोक्याला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून बाहेर झाला. 

ईशांत शर्मानं टेस्ट क्रिकेटमध्ये 10 व्यांदा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. ईशांतनं करिअरचा 96 वा टेस्ट खेळताना हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याच्या नावावर 96 टेस्टच्या 172 डावात 288 विकेट्स घेतल्या आहेत. 

12 वर्षानंतर धडक कामगिरी 

ईशांत शर्मानं 12 वर्षांनंतर घरगुती मैदानावर एक टेस्टच्या खेळीत पाच विकेट्स घेतल्या. गेल्यावेळी पाकिस्तान विरूद्ध बंगळुरूमध्ये करिअरचा दुसरा टेस्ट सामना खेळताना ईशांतनं खेळीत 118 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. हा त्यांच्या टेस्ट करिअरमधील दुसरा टेस्ट होता. ईशांतला घरगुती मैदानावर दुसऱ्यांदा यश मिळवण्यासाठी 94 टेस्ट सामन्यांची वाट पाहावी लागली. 

जावगल श्रीनाथची बरोबरी

ईशांत शर्मानं करिअरमध्ये 10 व्यांदा एक टेस्ट खेळीत पाच विकेट घेऊन माजी दिग्गज जवागल श्रीनाथची बरोबरी केली आहे. भारतासाठी सर्वांत जास्त वेळा पाच विकेट्स घेणारा वेगवाग बॉलरच्या यादीत पहिल्या स्थानावर कपिल देव आहे. त्यांनी 23 वेळा एका टेस्टच्या डावात पाच आणि त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानावर झहीर खान आहे. झहीरनं करिअरमध्ये 11 वेळा असं केलं होतं. ईशांत आणि श्रीनाथ आता या यादीत सामायिक फॉर्मनी तिसरं स्थान मिळवलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी