Team India: धोनीवर लावले मोठे आरोप, या क्रिकेटरच्या विधानाने उडवली खळबळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 14, 2022 | 12:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर एका क्रिकेटरने त्याच्या नेतृत्वात संधी न देण्याचा आरोप केला आहे. या क्रिकेटरने हा दावाही केला की टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्यामुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले. या क्रिकेटरने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ms dhoni
Team India:या क्रिकेटरने धोनीवर केले मोठे आरोप, उडवली खळबळ 
थोडं पण कामाचं
  • आम्ही बोलत आहोत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेबद्दल...
  • निवृत्ती घेतल्यानंतर या क्रिकेटरने आपला राग व्यक्त केला आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर अनेक आरोप केले आहेत.
  • ईश्वर पांडेला टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही.

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर(team india former cricketer ms dhoni) एका क्रिकेटरने त्याच्या नेतृत्वात संधी न दिल्याचा आरोप केला आहे. या क्रिकेटरने असाही दावा केला की टीम इंडियामध्ये(team india) संधी न मिळाल्यामुळे त्याचे करिअर(career) उद्ध्वस्त झाले. या क्रिकेटरने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा(retirement announce from international cricket) केली आहे. Ishwar Pandey take a  dig on MS dhoni for not giving chance in team india

अधिक वाचा - जखमी तरुणाला JCB ने नेलं रुग्णालयात

धोनीवर लावलेत मोठे आरोप

आम्ही बोलत आहोत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेबद्दल...त्याने नुकतेच क्रिकेटला अलविदा  म्हटले आहे. निवृत्ती घेतल्यानंतर या क्रिकेटरने आपला राग व्यक्त केला आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर अनेक आरोप केले आहेत. इश्वर पांडेचे म्हणणे आहे की धोनीने जर त्याच्यावर थोडाजरी विश्वास टाकला असता आणि आणखी काही संधी दिल्या असत्या तर त्याचे करिअर वेगळे असते. 

या क्रिकेटरच्या विधानाने खळबळ

दैनिक जागरणशी बोलताना ईश्वर पांडेने सांगितले, मला महेंद्रसिंग धोनीने संधी दिल्या असत्या तर माझे करिअर काही वेगळे असते. त्यावेळेस माझे वय २३-२४ वर्षे होते आणि माझा फिटनेसही चांगला होता. जर त्यावेळेस धोनी भाईने मला टीम इंडियामध्ये चान्स दिला असता तर मी माझ्या देशासाठी चांगली कामगिरी करू शकलो असतो आणि माझे करिअरही वेगळे असते. 

टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही खेळू शकला

ईश्वर पांडेला टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आयपीएलमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली. ईश्वर पांडेने आयपीएलच्या २५ सामन्यांमध्ये १८ विकेट घेतल्या. तर  ७५ फर्स्टक्लास सामन्यात २६३ विकेट मिळवल्या. इश्वर पांडेला २०१४मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी संघात स्थान मिळाले होते त्यावेळेस धोनी कर्णधार होता मात्र धोनीने ईश्वर पांडेला संधी दिली नाही.

अधिक वाचा - दिवसातून किती वेळा खावे?, जाणून घ्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून

सुरेश रैनाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

सुरेश रैनाने नुकतीच्या क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीसह निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी