आयएसएसएफने विश्वचषक नेमबाजीत मैराज खानला ऐतिहासिक सुवर्ण

अनुभवी मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करत भारताला या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ४० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.  कोरियाच्या मिन्सू किम (३६ गुण) आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन (२६ गुण) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.

ISSF's World World's shooting Mairaj Khan Gold Medal
आयएसएसएफने विश्वचषक नेमबाजीत मैराज खानला ऐतिहासिक सुवर्ण  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  अनुभवी मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करत भारताला या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ४० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.  कोरियाच्या मिन्सू किम (३६ गुण) आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन (२६ गुण) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.

दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेला मैराज सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. मैराजने रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. दुसरीकडे अंजुम मुदगिल, आशी चौक्सी आणि सिप्ट कौर सामरा या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात कांस्यपदक पटकावले. भारतीय नेमबाजांनी ऑस्ट्रियाच्या शेलीन वैबेल, नादीन उन्गराक आणि रेबेका कोएक यांना १६-६ अशा फरकाने पराभूत केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी