सचिनच्या मुलाकडून अपेक्षा करणं व्यर्थ, कपिल देव यांचं धक्कादायक वक्तव्य

Kapil Dev On Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएलच्या या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड या मुद्द्यावर अलीकडेच म्हणाले की, अर्जुनला अजूनही आपले कौशल्य आणखी सुधारण्याची गरज आहे. आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी या प्रकरणावर आपले मत मांडले आहे.

It is useless to expect from Sachin's son, Kapil Dev's shocking statement
सचिनच्या मुलाकडून अपेक्षा करणं व्यर्थ, कपिल देव यांचं धक्कादायक वक्तव्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अर्जुन तेंडुलकरला आयपीएलच्या या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
  • तेंडुलकरचे नाव समोर आले की अर्जुनकडून अपेक्षा
  • दबाव न घेता अर्जुनने खेळले पाहिजे, असा सल्ला कपिल देव यांनी दिला

मुंबई : मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2022 मध्येही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचा भाग आहे. नुकतेच विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवने अर्जुन तेंडुलकरवर मोठे वक्तव्य केले आहे. (It is useless to expect from Sachin's son, Kapil Dev's shocking statement)

अधिक वाचा : 

French Open च्या सेमीफाइनलमध्ये मुलीचा प्रोटेस्ट, खेळाडू सोडून पळाले कोर्ट

अर्जुन तेंडुलकरचे आडनाव तेंडुलकर असल्यामुळे त्याला नेहमीच अतिरिक्त दबाव जाणवेल, असा विश्वास कपिल देव यांना वाटतो. पण त्यांना स्वतःचा खेळ खेळायचा आहे. कपिल देव म्हणाले, 'सर्वजण त्याच्याबद्दल का बोलत आहेत, कारण तो सचिनचा मुलगा आहे. त्याला त्याचे क्रिकेट खेळू द्या आणि त्याची सचिनशी तुलना करू नका. तेंडुलकरचे नाव घेण्याचे फायदे आणि तोटे आहेत. डॉन ब्रॅडमनच्या मुलाने त्याचे नाव बदलले कारण तो अशा प्रकारचा दबाव हाताळू शकला नाही, कारण प्रत्येकाला अपेक्षा होती की तो त्याच्या वडिलांसारखा असेल.

अधिक वाचा : 

Team India: विश्वविक्रम करण्यापासून भारतीय संघ एक पाऊल दूर; आफ्रिकेविरूद्ध इतिहास रचण्याची सुवर्णसंधी


कपिल देव यांनी ही मोठी गोष्ट सांगितली

कपिल देव त्यांच्या वक्तव्यात पुढे म्हणाले, अर्जुनवर दबाव आणू नका. तो युवा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू त्याचे वडील असताना त्याला काहीही सांगणारे आपण कोण? मी अर्जुनला एकच सांगू इच्छितो की जा आणि तुझ्या खेळाचा आनंद घे. काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या वडिलांसारखे 50 टक्के बनू शकता तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. तेंडुलकरचे नाव समोर आले की आपल्या आशा उंचावतात कारण सचिन हा महान खेळाडू होता.

अधिक वाचा : 

World Test Championship: झाली घोषणा! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत होणार या मैदानावर 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त 2 टी-20 खेळलो

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2022 हे एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. असे असूनही सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संपूर्ण स्पर्धेत संधी मिळाली नाही. 22 वर्षीय अर्जुनने आपल्या करिअरमध्ये आपल्या घरच्या टीम मुंबईसाठी फक्त दोन टी-20 सामने खेळले आहेत. IPL मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी