Sara Tendulkar Viral Photo | नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेकदा चर्चेत असतो. त्याचबरोबर त्याची मुलगी साराही चर्चेचा विषय ठरते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. ती रोज काही ना काही पोस्ट शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. अलीकडे साराचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सारा एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. त्या फोटोवरून अशी चर्चा रंगली आहे की तो तिचा बॉयफ्रेंड आहे. (It was not Shubman Gill but Vanraj Zaveri who openly hugged Sara Tendulkar).
अधिक वाचा : भाजपच्या 12 आमदारांना SC ने दिला मोठा दिलासा
सारा तेंडुलकरचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ती तिच्या मित्रपरिवारासोबत दिसत असते. पण यावेळी व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सारा तेंडुलकरने एका मिस्ट्री मॅनला मिठी मारली आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक मुलगा सारा तेंडुलकरच्या शेजारी उभा आहे, त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. मिस्ट्री मॅनने साराच्या खांद्यावर हात ठेवला आहे. त्याचबरोबर साराही त्याच्या जवळ दिसत आहे. मात्र त्या फोटोबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की तो व्यक्ती भारताच क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) आहे. पण तसे काही नाही. त्या फोटोत साराच्या शेजारी उभा असलेला मुलगा वनराज झवेरी (Vanraj Zaveri) आहे, जो प्रसिद्ध ज्वेलरी कंपनी 'जावर'चा सीईओ आहे. साराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या वर्कफ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, सारा ना क्रीडा विश्वात आहे ना फिल्मी दुनियेत. त्यापेक्षा सारा मॉडेलिंगमध्ये जास्त सक्रिय असते. चाहत्यांना तिला एका यशस्वी मॉडेलच्या स्वरूपात पाहायचे आहे. त्याचबरोबर साराचा चाहता वर्ग देखील एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.