जेम्स अँडरसन 'अद्वितीय अर्धशतक' करणारा जगातील पहिला गोलंदाज 

न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजी करताना जेम्स अँडरसनने दुहेरी कामगिरी केली. त्याने डावात 4 विकेट घेतल्या.

james anderson become firsr bowler in world to bowled in 50 test innings at a ground read in marathi
जेम्स अँडरसन 'अद्वितीय अर्धशतक' करणारा जगातील पहिला गोलंदाज   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जेम्स अँडरसनने किवी संघाविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी 66 धावांत 4 बळी घेतले
  • न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडची शानदार सुरुवात
  •  लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटच्या 50 व्या डावात गोलंदाजी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला.

लंडन : इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले. किवी संघाविरुद्ध गोलंदाजीची सलामी देताच त्याने विशेष अर्धशतक पूर्ण केले. (james anderson become firsr bowler in world to bowled in 50 test innings at a ground read in marathi )

लॉर्ड्सवर 50व्यांदा कसोटी डावात गोलंदाजी केली

एकाच मैदानावर ५० कसोटी डावात गोलंदाजी टाकणारा जेम्स अँडरसन जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर त्याने ही कामगिरी केली. त्याच्याआधी जगातील अन्य कोणत्याही गोलंदाजाला एका मैदानावर इतक्या कसोटी डावात गोलंदाजी टाकता आली नाहीत. त्याच्यानंतर सहकारी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही ब्रॉड ही कामगिरी करेल. लॉर्ड्सवर त्याने 49 कसोटी डावात गोलंदाजी केली आहे.

या दोघांनंतर मुथय्या मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने कोलंबोतील एसएससी मैदानावर 46 डावात गोलंदाजी केली. त्याचवेळी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासनेही कोलंबोतील एसएससी मैदानावर 40 डावात गोलंदाजी केली.

पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करताना 550 बळी पूर्ण केले

पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करत जेम्स अँडरसननेही आपल्या 550 विकेट्स पूर्ण केल्या. न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत अँडरसनने गोलंदाजीची सुरूवात केली. डावाच्या तिसऱ्या षटकात त्याने विल यंगला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. यानंतर पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टॉम लॅथमही अँडरसनच्या चेंडूवर बेअरस्टोकरवी झेलबाद झाला.

अँडरसनने पहिल्या डावात 16 षटकात 66 धावा देऊन 4 बळी घेतले आणि पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करताना त्याच्या बळींची संख्या 550 च्या पुढे नेली. हा टप्पा गाठणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ग्लेन मॅकग्रा या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीची सलामी देताना मॅकग्राने एकूण 469 विकेट घेतल्या. तर तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या कपिल देवने 411 आणि रिचर्ड्स हेडलीने 398 विकेट घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी