James Anderson: जेम्स अँडरसनने रचला इतिहास, एका झटक्यात तोडला ११० वर्षे जुना रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 19, 2022 | 17:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

ENG vs SA: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत हा रेकॉर्ड केला. 

james anderson
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, तोडला ११० वर्षे जुना रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • जेम्स अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १८ ओव्हरमध्ये ५१ धावा गेत १ विकेट आपल्या नावे केला.
  • त्याने द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला ४७ धावांच्या स्कोरवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
  • जेम्स अँडरसन या विकेटसह ४० वर्षाच्या वयानंतर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.

मुंबई: इंग्लंड संघाचा(england team) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने(faster bowler james anderson) कसोटी क्रिकेटच्या(test cricket) बेस्ट गोलंदाजांपैकी एक आहे. जेम्स अँडरसन ४० पेक्षा अधिक वयात कसोटी क्रिकेटमध्ये(cricket) आपला जलवा दाखवत आहे. एका वेगवान गोलंदाजासाठी या वयात खेळणे खरंच कठीण आहे. मात्र जेम्स अँडरसन केवळ खेळत नाही आहे तर मोठमोठे रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. जेम्स अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरूवारी एक अशी कामगिरी केली जी याआधी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याच गोलंदाजाला करता आलेली नाही. (James Anderson break 110 old record in cricket)

अधिक वाचा - अशा बोटांच्या मुली असतात खूप लकी, चमकवतात पतीचे भविष्य

जेम्स अँडरसनने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

जेम्स अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १८ ओव्हरमध्ये ५१ धावा गेत १ विकेट आपल्या नावे केला. त्याने द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला ४७ धावांच्या स्कोरवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जेम्स अँडरसन या विकेटसह ४० वर्षाच्या वयानंतर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे. यासोबतच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५८ विकेट झाल्या आहेत. तो जगातील यशस्वी वेगवान गोलंदाजही आहे. 

११० वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

जेम्स अँडरसनआधी कसोटी विकेट घेणाऱ्या जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ऑस्ट्रेलियाचे सिडनी बार्नेस होते. त्यांनी ३९ वर्षे ५२ दिवस इतक्या वयात १९१२मध्ये विकेट मिळवली होती. तर जेम्स अँडरसनने ४० वर्षे १९ दिवस इतक्या वयात ही कामगिरी केली. जेम्स अँडरसनशिवाय भारताचाचे महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकाचे रंगना हेरथ यांनी ४० पेक्षा जास्त वयात कसोटी विकेट घेतली आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू स्पिनर होते आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाज आहे. 

अधिक वाचा - सर्वांच्या भविष्यात घडणारी गोष्ट नेत्राला दिसणार

जेम्स अँडरसनचे शानदार करिअर

जेम्स अँडरसनने २००३मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. जेम्स अँडरसन आतापर्यंत इंग्लंडसाठी १७३ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याच्या नावावर ६५८ विकेट आहेत आणि ही संख्या आणखीन वाढणार आहे. तर जेम्स अँडरसन १९४ वनडे सामने खेळला आहे. यात त्याच्या नावावर २६९ विकेट आहेत तर १९ टी-२० सामन्यांमध्ये १८ विकेट आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी