James Anderson: तेंडुलकर, पाँटिंगलाही जे जमले नाही ते जेम्स अँडरसनने करून दाखवले

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 25, 2022 | 17:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

England vs South Africa: इंग्लंचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने गुरूवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मँचेस्टरमध्ये खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत उतरताच इतिहास रचला. 

james anderson
तेंडुलकर, पाँटिंगलाही जे जमले नाही ते अँडरसनने करून दाखवले 
थोडं पण कामाचं
  • २००३मध्ये डेब्यू करणाऱ्या अँडरसनचा करिअरमधील हा १७४ वा सामना आहे
  • तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामना खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे.
  • आपल्याच देशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे.

मुंबई: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने(england cricketer james anderson) कसोटी क्रिकेटमध्ये(test cricket) एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध(england vs south africa) मँचेस्टरमध्ये(machester) खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उतरताच इतिहास रचला. अँडरसनला इंग्लंडच्या धरतीवरील हा १०० वा कसोटी सामना आहे. आपल्याच देशात १०० कसोटी सामने(100 test matches) खेळणारा तो जगातील एकमेव क्रिकेटर बनला आहे.(James Anderson make world record in test cricket history)

अधिक वाचा -  'या' 5 गोष्टी तुमच्यासोबत रोज होतात? मग तुमचा संसार धोक्यात

२००३मध्ये डेब्यू करणाऱ्या अँडरसनचा करिअरमधील हा १७४ वा सामना आहे आणि तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामना खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र आपल्याच देशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने भारतात ९४ कसोटी सामने खेळलेत आणि परदेशी धरतीवर १०६ कसोटी सामने खेळलेत. ९२ सामन्यांसह रिकी पाँटिंग तिसऱ्या आणि स्टुअर्ट ब्रॉड ९० सामन्यांसह या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. 

या सामन्यात अँडरसनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ९५० विकेट पूर्ण करण्याची संधी असेल. या आकड्यापर्यंत पोहोचणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज बनू शकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने एकूण १३४७ विकेट घेतल्या आहेत. १००१ विकेटसह ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे आणि ९५६ विकेटसह अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. 

मोडला ११० वर्षे जुना रेकॉर्ड

अँडरसनने द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १८ ओव्हरमध्ये ५१ धावा देत १ विकेट आपल्या नावे केला. त्याने द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला ४७ धावांच्या स्कोरवर माघारी धाडले. या विकेटसह ४० वर्षाच्या वयानंतर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणारा जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. सोबतच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५८ विकेट झाल्यात. तो जगातील यशस्वी वेगवान गोलंदाजही आहे. 

अधिक वाचा - आशिया कपमध्ये हा संघ धोकादायक, भारताला सांभाळून राहावे लागेल

अँडरसनचे करिअर

जेम्स अँडरसनने आतापर्यंत १७३ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने ६५८ विकेट घेतल्या आहेत.तसेच ही संख्या आणखीन वाढणार आहे. तर जेम्स अँडरसन १९४ वनडे सामने खेळला आहे. यात त्याने २६९ विकेट घेतल्या आहेत तर १९ टी-२० सामन्यांमध्ये १८ विकेट घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी