GER vs JAP, FIFA WC: आणखी एक उलटफेर, जपानने चार वेळच्या चॅम्पियन जर्मनीचा केला पराभव 

Germany vs Japan Match Highlights, FIFA World Cup 2022:  FIFA World Cup 2022 मध्ये बुधवारी आणखी एक मोठा अपसेट झाला. जर्मनी आणि जपान यांच्यात झालेल्या सामन्यात जपानने माजी विश्वविजेत्या जर्मनीचा 2-1 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. यापूर्वी अर्जेंटिनासोबत असे घडले होते.

japan beat germany in fifa world cup 2022 match read in marathi
जपानने चार वेळच्या चॅम्पियन जर्मनीचा केला पराभव  
थोडं पण कामाचं
  • फुटबॉल वर्ल्ड 2022 मध्ये, बुधवारी चाहत्यांनी आणखी एक अपसेट पाहायला मिळाला.
  • या स्पर्धेत मंगळवारी सौदी अरेबियाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव करून जगाला चकित केले.
  • बुधवारी चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीचा पहिल्याच सामन्यात जपानकडून 2-1 असा पराभव झाला.

Japan vs Germany, FIFA World Cup 2022, Match Highlights:  फुटबॉल वर्ल्ड 2022 मध्ये, बुधवारी चाहत्यांनी आणखी एक अपसेट पाहायला मिळाला. या स्पर्धेत मंगळवारी सौदी अरेबियाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव करून जगाला चकित केले. दुसरीकडे, बुधवारी चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीचा पहिल्याच सामन्यात जपानकडून 2-1 असा पराभव झाला. (japan beat germany in fifa world cup 2022 match read in marathi)

सामन्याचा पूर्वार्धात सुरुवातीला संघर्षमय होता, मात्र ३३व्या मिनिटाला पेनल्टी जिंकल्याने जर्मनीला संजीवनी मिळाली. जसे अर्जेंटिनाला आदल्या दिवशी पेनल्टी मिळाला होता. तिथे मेस्सीने गोल केला आणि इथे जर्मनीसाठी गुंडोगनने गोल करून जर्मन संघाला जपानविरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पूर्वार्धात आणखी एकही गोल झाला नाही.


उत्तरार्धात जर्मन फॉरवर्ड लाइनचे खेळाडू जोरदार आक्रमण करतील, अशी अपेक्षा होती, पण घडले उलटे. जपानचा संघ चुरशीचा दिसत होता आणि 75व्या मिनिटाला रित्सू डोआनने जपानसाठी पहिला गोल करून जपानला बरोबरी साधून दिली.

आता सामना रोमांचक झाला होता आणि जर्मन संघ पूर्णपणे दडपणाखाली दिसत होता. त्यानंतर 83व्या मिनिटाला ताकुमा असानोने गोलरक्षकाच्या जवळ जाऊन अप्रतिम गोल केला आणि संपूर्ण जपानी कॅम्प जल्लोषात बुडून गेला. अखेरच्या मिनिटांत त्यांना 2-1 अशी आघाडी मिळाली होती. यानंतर जर्मन संघाने शेवटपर्यंत खूप प्रयत्न केले, 7 मिनिटांचा इंज्युरी टाईमही मिळाला मात्र त्यांना गोल करता आला नाही आणि जपानने चमत्कारिक विजय मिळवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी