मुंबई: लखनऊ सुपर जायंट्स(lucknow super giants) संघ आयपीएल २०२२(ipl 2022)मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. यावेळेस मुंबईच्या मैदानावर लखनऊ आणि सनरायजर्स हैदराबाद संघ आमने सामने आहेत. या सामन्यात लखनऊच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एका स्टार ऑलराऊंडरला जागा मिळाली आहे. हा खेळाडू काही बॉलमध्ये सामन्याचे चित्र पालटवू शकतो. jason holder enter in lucknow supergiants in ipl 2022
अधिक वाचा - बजरंगबलीला राशीनुसार द्या या गोष्टींचा नैवेद्य
सनरायजर्स हैदराबादविरुद्ध कर्णधार लोकेश राहुलने लखनऊ टीममध्ये घातक ऑलराऊंडर जेसन होल्डरला स्थान दिले आहे. होल्डर गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर आघाडीवर आहे. होल्डरला श्रीलंकेचा गोलंदाज दुश्मंथा चमीराच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. होल्डर लखनऊच्या संघात आल्याने त्याची बॉलिंग आणि बॅटिंग मजबूत झाली आहे.
जेसन होल्डर टी-२० क्रिकेटमध्ये लांब शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे ज्याच्या जोरावर तो कोणत्याही पिचवर धावा करू शकेल.खालच्या क्रमांकावर तो जबरदस्त फलंदाजी करू शकतो. त्याने आपल्या जोरावर वेस्ट इंडिजला अनेक सामने जिंकून दिलेत. याआधी जेसन होल्डर हैदराबाद संघात होता. मात्र मेगा लिलावात लखनऊने त्याला खरेदी केले. तो विकेट्सदरम्यान चांगली धाव घेतो. होल्डरने आयपीएलच्या २६ सामन्यांमध्ये १८९ आणि ३५ विकेट मिळवल्या आहेत.
जेसन होल्डरने इंग्लंडविरुद्ध चार बॉलमध्ये ४ विकेट मिळवल्या होत्या. तो वेस्ट इंडिजसाठी टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्याचे चार ओव्हर खेळणे कोणत्याही गोलंदाजासाठी सोपे नाही. तो अतिशय कंजुसीने धावा घेतो. त्याची खासियत म्हणजे तो डेथ ओव्हर्समध्येही विकेट घेतो.
अधिक वाचा - फीसाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणाऱ्या शाळेवर गुन्हा
लखनऊ सुपर जायंट्स हा संघ आयपीएलमध्ये नव्याने दाखल झाला आहे. लखनऊकडे अनेक स्टार प्लेयर्स आहेत जे सामने जिंकून देऊ शकतात. लखनऊकडे लोकेश राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या रूपात जबरदस्त सलामीची जोडी आहे. मिडल ऑर्डरमध्ये त्यांच्याकडे एविन लेविस, मनीष पांडे आणि जेसन होल्डरसारखे विस्फोटक फलंदाज आहेत.