ICC ODI RANKING: इंग्लंड मालिकेनंतर बुमराहला मोठा धक्का, पांड्यासाठी गुडन्यूज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 20, 2022 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jasprit bumrah: भारत-इंग्लंड वनडे मालिकेनंतर आयसीसीने ताजी वनडे रँकिंगची घोषणा केली आहे. यात भारताच्या जसप्रीत बुमराहचे नुकसान झाले आहे तर हार्दिक पांड्याला फायदा झाला आहे. 

jasprit bumrah
बुमराहला वनडे रँकिंगमध्ये फटका, हार्दिक पांड्याची उडी 
थोडं पण कामाचं
  • आयसीसी वनडे रँकिंग
  • भारत-इंग्लंड मालिकेनंतर जाहीर झाली ताजी रँकिंग
  • जसप्रीत बुमराहचे मोठे नुकसान, हार्दिक पांड्याची उडी

मुंबई: टीम इंडियाने(team india) इंग्लंड दौऱ्यावर(england tour) ज्या अंदाजात यजमान संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात दिली ते पाहून साऱ्यांचेच मन जिंकले. दरम्यान आयसीसीकडून(icc) जाहीर झालेल्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये(one day ranking) याचा मिळताजुळता परिणाम पाहायला मिळाला. एकीकडे टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला(jasprit bumrah) वनडे रँकिंगमध्ये नुकसान झाले तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने(hardik pandya) मोठी उडी घेतली. (Jaspreet Bumrah slide down and Hardik Pandya jumped high in icc one day ranking)

अधिक वाचा - बेन स्टोक्सच्या शेवटच्या सामन्यात झाला हा मोठा रेकॉर्ड

जसप्रीत बुमराह ताज्या वनडे रँकिंगमध्ये एका स्थानावरून घसरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. बुमराहच्या कमरेच्या त्रासामुळे शेवटचा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला आपले अव्वल स्थान गमवावे लागले. गोलंदाजांच्या वनडे रँकिंगमध्ये  न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७०४ रेटिंग गुणासह अव्वल स्थानावर आहे. तर बुमराह त्याच्या मागे आहे. युझवेंद्र चहल चार स्थानांनी पुढे जात चौथ्या स्थानावर गेला आहे. 

ऑलराऊंडर्सची रँकिंग

दुसरीकडडे हार्दिक पांड्या ऑलराऊंडर्सच्या यादीत १३व्या स्थानांवरून जोरात उडी घेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्ध सहा विकेट आणि शंभरपेक्षा अधिक धावा करणाऱ्या पांड्या फलंदाजाच्या रँकिंगमध्ये आठ स्थानांनी वर चढत ४२व्या स्थानावर आला आहे. ऑलराऊंडर्सच्या लिस्टमध्े इंग्लंडचा बेन स्टोक्स चार स्थानांनी घसरून पहिल्या १०मधून बाहेर झाला आहे. स्टोक्सने वनडेतून निवृत्ती घेतली आणि त्याने मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळला. 

अधिक वाचा - करीना कपूर तिसऱ्यांदा Pregnant?,चर्चेवर दिलं फनी उत्तर

बाबर, विराट आणि रोहितची स्थिती

याशिवाय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजाच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर भारताचा फलंदाज विराट कोहली चौथ्या आणि रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. तर शेवटच्या वनडेत नाबाद १२५ धावा ठोकणारा पंत२५ स्थानांनी पुढे जात ५२व्या स्थानावर पोहोचला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी