Bumrah Catch Video: कॅप्टन जसप्रीत बुमराहने घेतलेला बेन स्टोक्सचा अप्रतिम कॅच

Jasprit Bumrah grabs stunning catch of Ben Stokes watch viral video : बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा कॅप्टन जसप्रीत बुमराह याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याचा अप्रतिम कॅच (झेल) घेतला. बुमराहने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jasprit Bumrah grabs stunning catch of Ben Stokes watch viral video
Bumrah Catch Video: कॅप्टन जसप्रीत बुमराहने घेतलेला बेन स्टोक्सचा अप्रतिम कॅच  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Bumrah Catch Video: कॅप्टन जसप्रीत बुमराहने घेतलेला बेन स्टोक्सचा अप्रतिम कॅच
  • बेन स्टोक्स २५ धावा करून शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर कॅच आऊट (झेल बाद)
  • बुमराहने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल

Jasprit Bumrah grabs stunning catch of Ben Stokes watch viral video : कोरोना संकटामुळे लांबणीवर टाकलेला इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या डावात ४१६ आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत ३ बाद १२५ धावा केल्या आहेत तर इंग्लंडने पहिल्या डावात २८४ धावा केल्या आहेत. भारताने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत २५७ धावांची आघाडी घेतली आहे. या बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा कॅप्टन जसप्रीत बुमराह याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याचा अप्रतिम कॅच (झेल) घेतला. बेन स्टोक्स २५ धावा करून शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर कॅच आऊट (झेल बाद) झाला. बेन स्टोक्सच्या जसप्रीत बुमराहने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

IND vs ENG: बर्मिंगहॅमध्ये खराब आहे टीम इंडियाचा टेस्ट रेकॉर्ड, इतिहास बदलणार?

MS Dhoni News:दुखापतीने त्रस्त आहे महेंद्रसिंग धोनी, महागडे नव्हे तर २० रूपयांचे औषध घेतोय

जसप्रीत बुमराह बर्मिंगहॅम कसोटीत कॅप्टन म्हणून अष्टपैलू कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. बुमराहने पहिल्या डावात १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. ही कामगिरी त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारत केली. नंतर बुमराहने १९ षटके गोलंदाजी केली. त्याने तीन निर्धाव षटके (मेडन ओव्हर) टाकली आणि ६८ धावा देत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद केले. अॅलेक्स लीस, झॅक क्रॉली आणि ओली पोप या इंग्लंडच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करण्याची किमया बुमराहने केली. 

Wimbledon 2022, Sania Mirza: शेवटचे विम्बल्डन खेळत असलेली सानिया मिर्झा दुसऱ्या फेरीत दाखल

बुमराहने फलंदाजी आणि गोलंदाजीतील चमकदार कामगिरी नंतर क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्रातही अप्रतिम कामगिरी केली. त्याने क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याचा अप्रतिम कॅच (झेल) घेतला. या कॅचचा (झेल) व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Neeraj Chopra:नीरज चोप्राने पुन्हा केली कमाल, आता प्रतिष्ठित डायमंड लीगमध्ये जिंकले मेडल

इंग्लंडचे पाच फलंदाज ८३ धावांत बाद झाले. यानंतर जॉनी बेअरस्टो (१०६ धावा) आणि बेन स्टोक्स (२५ धावा) यांची जोडी जमली. अखेर शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर बेन स्टोक्सचा अप्रतिम कॅच (झेल) घेऊन बुमराहने ही जोडी फोडली. बुमराहने एक कठीण कॅच (झेल) घेतल्याचे पाहून स्वतः बेन स्टोक्स पण चक्रावला. विशेष म्हणजे बर्मिंगहॅम कसोटीत आधी शार्दुल ठाकुर आणि बुमराहने बेन स्टोक्सचे कॅच सोडले होते. पण नंतर शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर बुमराहने बेन स्टोक्सला कॅच आऊट (झेल बाद) केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी